बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील काही चित्रपट अजून आपल्या आठवणीत असतात अगदी स्टोरी आणि डायलॉगसह. असाच एक चित्रपट म्हणजे सलमान आणि काजोलचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट सर्वात संस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सत्तावीस वर्षे उलटून गेली आहेत, परंतु त्यातील पात्रे, तसेच यातील गाणी लोकांच्या आठवणीत आजही आहेत. सलमान आणि काजोलची जोडी देखील लोकांच्या पसंतीस उतरली होती. या व्यतिरिक्त, अरबाज खान आणि अंजली झवेरी ही जोडी देखील प्रेक्षकांना तेवढीच भावली होती.
अभिनेत्रीच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली
या चित्रपटात अरबाज खानने विशाल ठाकूरची भूमिका केली होती, तर अंजली झवेरीने त्याची प्रेयसी उजालाची भूमिका केली होती. चित्रपटात तिला मर्यादित स्क्रीन टाइम असूनही, अंजलीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. अंजलीने तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने कमी स्क्रीन टाइममध्येही स्वत:ची छाप सोडली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी तिची तुलना काजोलशी करायला सुरुवात केली होती.
View this post on Instagram
A post shared by Tarun Arora (@tarun_raj_arora)
बॉलिवूडमध्ये प्रवेश कसा झाला?
अंजली झवेरीचा जन्म लंडनमध्ये एका अनिवासी भारतीय कुटुंबात झाला. तिच्या बॉलिवूड पदार्पणाचे श्रेय ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना जाते, ज्यांनी तिला त्यांचा मुलगा अक्षय खन्ना सोबत “हिमालय पुत्र” या चित्रपटातून लाँच केले. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार यश मिळवलं नसलं तरी अंजलीच्या साधेपणा आणि आकर्षक लूकने प्रेक्षकांना भुरळ घातली. तथापि, तिच्या आकर्षक सौंदर्य आणि प्रतिभा असूनही, ती बॉलिवूडमध्ये फार काळ यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर, अंजली दक्षिण भारतीय चित्रपटांकडे वळली आणि तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.
अंजली आता कुठे आहे आणि काय करते?
दक्षिण भारतीय प्रेक्षकांनी तिला मनापासून स्वीकारले आणि तिने देखील अनेक हिट चित्रपट दिले. हिंदीमध्ये, तिने “बेताबी” मध्ये चंद्रचूड सिंगसोबतही काम केले. लग्नानंतर, अंजलीने चित्रपटसृष्टीला निरोप दिला. आता, ती इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर आहे आणि तिचा बहुतेक वेळ मुंबई आणि गोव्यात घालवते. अंजली झवेरीचे लग्न अभिनेता तरुण अरोराशी झाले आहे, तोच तरुण ज्याने “जब वी मेट” मध्ये अंशुमनची भूमिका केली होती. आज, अंजली तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे, लाइमलाइटपासून दूर शांत आणि आंनदी जीवन जगत आहे. पण अंजलीमध्ये आता खूप बदल झाला असून तिला इतक्या वर्षांनी ओळखणं आता कठीण झालं आहे.