नाटक
esakal November 13, 2025 10:45 AM

राज्य नाट्य स्पर्धा-----------लोगो
(१२ नोव्हेंबर पान दोन)

- rat१२p१२.jpg-
२५O०३९०९
रत्नागिरी ः ज्ञानप्रबोधिनी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ दत्तवाडी-राजापूर या संस्थेच्या फुर्वज या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)


जमिनी विकून नका....चा
संदेश देणारे ‘फुर्वज’
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ः कोकणची सौंदर्यवाढ प्रकल्प येऊन होत नाही तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पूर्वजांनी कष्टाने जपून ठेवलेल्या जमिनी विकण्यापेक्षा कष्ट करून, कसून सौंदर्यात भर टाकणे योग्यच. कष्टकरी कुटुंबावर जागा विकण्याच्या आलेल्या परिस्थितीवर मात कशी केली जाते याचं उत्तम उदाहऱण लेखक-दिग्दर्शक प्रसाद पंगेरकर यांच्या ‘फुर्वज’ या नाटकातून पाहायला मिळाले. सहजसुंदर मालवणी भाषेतून जाणारे आशयगर्भ, सहजाकलनीय संवाद तसेच प्रसंगातून उलगडत जाणारे विनोद मालवणी तडक्याचा आस्वाद रसिकांनी घेतला. राज्य नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या पुष्पात सावरकर नाट्यगृहात या नाटकाचे सादरीकरण झाले. विस्मृतीत गेलेल्या पूर्वजांची आठवण या नाटकाने करून दिली. ज्ञानप्रबोधिनी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ दत्तवाडी-राजापूर या संस्थेने हा प्रयोग सादर केला. अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत अशा चोहोबाजूनी रंगतदार झाला.
-------
काय आहे नाटक ?

प्रसाद पंगेरकर लिखित ‘फुर्वज’ हे नाटक ग्रामीण महाराष्ट्रातील एका कष्टकरी कुटुंबाच्या संघर्षाची आणि कोकणातील मातीशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याची गाथा आहे. अत्यंत रंजक आणि हृदयस्पर्शी कथानक तसेच अस्सल मालवणी भाषेचा प्रभावी वापर यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. नाटकाच्या केंद्रस्थानी सदानंद आणि पार्वती हे कष्टकरी दाम्पत्य आहे.
सदानंद मुंबईतील चांगली नोकरी सोडून रूम विकून गावाला येतो आणि गावात हॉटेल, पोल्ट्री, कलिंगडाची शेती करू लागतो; पण त्यात यश येत नाही. याच दरम्यान, सदानंद याचा मुलगा बारावीनंतर मुंबईला नोकरीसाठी जातो. संसार सुरू असताना सदानंद आणि पार्वती यांच्यात वाद होत असतात; पण पार्वती त्याला उत्तम साथ देते. कालांतराने, मुलगा मुंबईतून गावाकडे येतो. त्याने मुंबईत घर घेण्यासाठी कन्स्ट्रक्शनमध्ये मित्राच्या मदतीने ५० हजार रुपये भरलेले असतात. उर्वरित रक्कम मिळावी यासाठी तो आई-वडिलांकडे तगादा लावतो. काका, मामा त्याला मदत करत असतात. त्यासाठी गावाकडची कातळजमीन विकून पैसे देण्याचे सदानंद यांना सांगतात. रात्री सदानंद झोपी जातो आणि त्यांच्या स्वप्नात त्यांचे फुर्वज तानू सुतार येतात. जमीन विकायची नाही, असे ते सदानंद यांना सांगतात. सकाळी उठल्यावर सदा जमीन विकायची नाही, असे सांगून मोकळा होतो. त्या वेळी सगळेच अचंबित होतात. दुसऱ्या दिवशी मुलाचा मामा-नारायण हा रात्री ज्या ठिकाणी सदानंद झोपतात तेथे झोपतो. त्याच्याही बाबतीत तसाच प्रकार घडतो. फुर्वज स्वप्नात येतो आणि त्याला मारहाण करतो. कुणालाच काही कळत नाही. सदा दिवसा कातळजमीन विकायची सांगतो. उठल्यावर नाही म्हणून सांगतो. सदाची पत्नी पार्वती हिला हे कोडच उलगडत नाही. ती अखेर एका बाबा (स्वामी), गुरव, भविष्य सांगणारे यांच्याकडे जाते. किमान सदानंदचे मत परिवर्तन होईल, असे तिला वाटत असते. या सगळ्याला ७५ हजार रुपये घालवते; मात्र मुलाला पैसे मिळत नाहीत. त्यावर मुलगा चिडतो आणि चक्क वडिलांना उलट बोलतो. मी पुन्हा गावाकडे येणार नाही, असे ठणकावून सांगतो. या प्रकारानंतर पत्नी पार्वती गळ्यातील सोन्याचे दागिने मंगळसुत्र, पाटल्या काढून मुलाच्या हातात देते त्या वेळी मुलगा कार्तिक ढसाढसा रडतो. मला मुंबईत रूम नको, मी गावातच राहून मोठा होईन, असे सांगतो. असे कथानक मालवणी भाषेतून ‘फुर्वज’ या नाटकातून मांडलेले आहे. नाटकाची कालसुसंगत उत्तम भाषा उत्कंठा वाढवणारी होती. कौटुंबिक वात्सल्यात पत्नीची साथ स्त्रीसन्मान याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. ग्रामीण गावातील जमिनी विकून मोठं होण्यापेक्षा त्या कसून कोकणसौंदर्यात भर घालावी, असाच संदेश फुर्वज या नाटकाने दिला. सर्वच कलाकारांचा अभिनय, गावाकडची उगम पावलेली मालवणी भाषाशैली साकारण्यात ज्ञानप्रबोधिनी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ दत्तवाडी संस्था यशस्वी झाली.
----
सूत्रधार आणि साहाय
प्रकाश संयोजन ः राकेश दांडेकर, अर्थव ठाकूरदेसाई; पार्श्वसंगीत ः प्रणव गिरकर, नेपथ्य ः जयवंत आंबेलकर, मिलिंद शिंदे; नेपथ्य सहाय्यः प्रदीप श्रृंगारे, रंगभूषा- वेशभूषा ः खुशी आडिवरेकर, भूमी आडिवरेकर.
----
* पात्र परिचय
पार्वती ः ऋतुजा मेस्त्री, सदाशिव ः प्रसाद पांगरकर, कार्तिक ः विध्नेश कणेरी, सुंदरा ः स्वरा मेस्त्री, नारायण ः प्रशांत मेस्त्री, विष्णू ः ओमकार गुरव, भाग्या ः भरत जाधव, जोशी ः संजय गोरे, फुर्वज ः बाळाराम नाचणेकर.
----
आजचे नाटक
नाटक ः मंगलाक्षता. सादरकर्ते ः खल्वायन-रत्नागिरी . स्थळ ः स्वा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर. वेळ ः सायंकाळी ७ वा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.