Rashid Khan : रशीद खानबरोबरची 'ती' महिला कोण? फोटो व्हायरल होताच स्वतः केला खुलासा
esakal November 13, 2025 10:45 AM

Rashid Khan Wife: काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू रशीद खान एका चॅरीटी कार्यक्रमात एका महिलेबरोबर दिसला होता. त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाले होते. रशीद खानबरोबर असलेली ती महिला नेमकी कोण? प्रश्न अनेकांनी विचारला होता. मात्र, रशीद खानने आता स्वत: या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संबंधित महिलेबाबत माहिती दिली आहे.

रशीद खान इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाला, फोटोतील महिला दुसरं कुणी नसून माझी पत्नी आहे. होय, मी निकाल केला आहे. रशीद खानने या पोस्टमध्ये त्याच्या दुसऱ्या लग्नाची कबूल दिली आहे. तो म्हणाला, “२ ऑगस्ट २०२५ रोजी मी माझ्या आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरु केला आहे. माझा निकाह झाला.''

Rashid Khan: सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर अफगाणिस्तानला सुधारणा करण्याची आवश्यकता : राशीद खान

पुढे तो म्हणाला, काही दिवसांपूर्वी मी माझ्या पत्नीला घेऊन एका चॅरिटी कार्यक्रमाला गेलो होतो. त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर अनेकांनी अनेक तर्कवितर्क लावली. ते बघून दुख: वाटलं. ती दुसरी कुणी नसून माझी पत्नी होती. यात लपवण्यासारखं काहीही नाही. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार,

Rashid Khan World Record: करामती खानने T20 मध्ये घडवला इतिहास! टॉप-२० मध्ये एकाही भारतीयाला स्थान नसलेल्या यादीत अव्वल

दरम्यान, अफगाणिस्तानचा संघ जानेवारी २०२६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेद्वारे ते २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी तयारी करतील. ही मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार असून, विश्वकप स्पर्धा ही फेब्रुवारीत भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.