वैदिक ज्योतिषातील 27 नक्षत्रांपैकी ‘ज्येष्ठा’ हे श्रेष्ठता, ज्ञान आणि अधिकाराचे प्रतीक मानलं जातं. या नक्षत्राच्या नावाचा अर्थ आहे ‘सर्वांत मोठी आणि सर्वांत ज्येष्ठ’. याच्या प्रभावाने व्यक्ती तीव्र बुद्धीची, नेतृत्वक्षम आणि प्रबळ इच्छाशक्तीची असते. दृक पंचांगानुसार 19 नोव्हेंबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 पर्यंत ग्रहांचे सेनापती मंगळ हे फलदायी ज्येष्ठा नक्षत्रात राहणार आहेत. सध्या मंगळ शनीच्या अनुराधा नक्षत्रात आहेत.
धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. ज्येष्ठा नक्षत्रात मंगळामुळे साहस आणि आत्मविश्वास वाढेल. नव्या प्रकल्पात किंवा व्यवसायात लाभ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. बुद्धिमत्ता आणि सूजबूजामुळे महत्त्वाचे निर्णय वेळेवर घेता येतील. आरोग्य उत्तम राहील, मानसिक संतुलन कायम राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवनात समाधान मिळेल. सृजनशील योजना आणि गुंतवणूक या काळात विशेष लाभदायक ठरतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)