Famous Artist Death: "गेम ऑफ थ्रोन्स" सह अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्ससाठी स्पेशल इफेक्ट्स एडिटिंगवर काम करणाऱ्या २९ वर्षीय कॅथरीन चॅपेल यांचे दुःखद निधन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत सफारी ट्रिप दरम्यान तिचा एक भयानक अपघात झाला. जोहान्सबर्गजवळील वन्यजीव उद्यानातून एका गाडीतून प्रवास करत असताना, तिच्यावर एका सिंहिणीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिचं निधन झालं आहे.
वृत्तानुसार, कॅथरीन तिच्या कारची खिडकी खाली करून तिच्या कॅमेऱ्याने सिंहिणीचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. काही क्षणातच, सामान्य वाटणारे दृश्य भयानक झाले. उन्हात बसलेली सिंहिणी अचानक उठली आणि उघड्या खिडकीतून झपाटून कॅथरीनवर हल्ला केला.
Actor Father Passes Away: बिग बॉस फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन; सोशल मीडियावर व्यक्त केली वेदनागाडीतील टूर गाईडने ताबडतोब पुढच्या सीटवर उडी मारली आणि सिंहिणीला थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की गाईडने सिंहिणीला ढकलण्याचा आणि मारण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला, परंतु हल्ला खूप वेगवान आणि प्राणघातक होता. पहिल्या हल्ल्यानंतर, सिंहिणी थोडी मागे हटली, तिच्या तोंडातून आणि पंजातून रक्त वाहत होते. तथापि, तिने लगेच दुसरा हल्ला केला, यामुळे कॅथरीनला गंभीर दुखापत झाली आणि तिचा उजवा खांदा निखळला. यामुळे तिचा मृत्यू झाला.