पिंपरी, ता. १५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) प्रशासकीय फेरबदल झाले आहेत. राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर नेमलेले नवे अधिकारी रुजू झाले आहेत. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबतचे आदेश काढले.
नाशिक येथील जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष रूपाली आवळे यांची प्रतिनियुक्तीवर बदली झाली. त्यांची प्रशासन सहआयुक्त म्हणून नेमणूक झाली. प्रशासन सहआयुक्त पूनम मेहता यांची अंतर्गत बदली झाली. आता त्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त असतील. सध्या अप्पर जिल्हाधिकारी नसल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाचा प्रभारी कार्यभार उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे. सहायक लेखापाल पोपट ठेंगळे यांचीही नव्याने नेमणूक झाली. दरम्यान, दोन तहसीलदार, शाखा अभियंता, अग्निशामक अधिकारी, कार्यकारी अभियंता अशी अनेक पदे रिक्त आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती येत्या काही दिवसांत होईल.
-----