टीम इंडियाचा युवा आणि ओपनर बॅट्समन यशस्वी जैस्वाल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरला. यशस्वी दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. उभयसंघातील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे. यशस्वीने या सामन्यातील पहिल्या डावात 12 धावा केल्या. यशस्वीने पहिल्या डावात टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फार वेळ मैदानात घालवता आला नाही. मार्को यान्सेन याने यशस्वीला बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना यशस्वीकडून भारतीय चाहत्यांना चांगली सुरुवात मिळवून देण्याची आशा होती. मात्र यशस्वीने दुसऱ्या डावात घोर निराशा केली. यशस्वीला दुसऱ्या डावात खातंही उघडता आलं नाही. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीला यासह मोठा डाग लागला. त्यामुळे यशस्वीला त्याच्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असा दिवस पाहावा लागला.
यशस्वी दुसऱ्या डावात सुपर फ्लॉपकर्णधार टेम्बा बावुमा याच्या चिवट अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामुळे केएल राहुल आणि यशस्वी या दोघांवर भारताला भक्कम अशी सुरुवात करुन देण्याची जबाबदारी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्याच षटकात पहिला झटका दिला. यशस्वी 4 चेंडू खेळून झिरोवर आऊट झाला. यशस्वीची यासह मायदेशात झिरोवर आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यशस्वी याआधी मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. मात्र त्याने किमान 1 धाव तरी केली होती. यशस्वीने भारतात खेळलेल्या सर्व 12 कसोटी सामन्यांमध्ये किमान 1 धाव केली होती.
यशस्वीला दुहेरी फटकायशस्वीची मायदेशात झिरोवर आऊट झाल्याने नाचक्की झालीच. सोबतच त्याचा परिणाम यशस्वीच्या सरासरीवरही झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी यशस्वीची सरासरी 51.65 अशी होती. मात्र झिरोवर आऊट झाल्यानंतर यशस्वीच्या सरासरीवर परिणाम झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, यशस्वीची सरासरी 50 च्या खाली आली आहे. यशस्वीची सरासरी 49.79 इतकी झाली आहे. त्यामुळे एका खेळीत अपयशी ठरल्याचा परिणाम कशाप्रकारे थेट कारकीर्दीवर होतो, हेच यातून स्पष्ट होतं.
यशस्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अपयशीयशस्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी राहिला आहे. यशस्वीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 सामने खेळले आहेत. यशस्वीला या 3 सामन्यात मिळून 100 धावाही करता आल्या नाहीत. यशस्वीने 10.33 च्या साधारण सरासरीने 62 धावा केल्या आहेत.