वास्तूशास्त्रात अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत की त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा मिळतो. घरात योग्य ऊर्जा टिकवून राहते. वास्तूशास्त्राप्रमाणेच फेंगशुईनुसारही अनेक वास्तू टीप्स सांगण्यात आल्या आहेत. ज्यामुळे असंख्य फायदे मिळतात. तसं पाहायला गेलं तर अनेकजण फेंगशुईनुसार बऱ्याच वस्तू घरात आणतात.घरात योग्य ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, फेंगशुईची तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, फेंगशुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे. आधुनिक जीवनात फेंगशुई अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
फेंगशुईशी अनेक वस्तू घरात ठेवल्यास असंख्य फायदे मिळतात
फेंगशुईशीसंबंधित अशा अनेक वस्तू आहेत ज्या तुमच्या घरात ठेवल्यास असंख्य फायदे देतात. कारण या वस्तूंमधून निघणारी ऊर्जा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनावर, घरावर लक्षणीय परिणाम करते. फेंगशुईमधील अशी एक वस्तू आहे जी तुमच्या घराच्या पश्चिमेकडील बाजूस लावली तर त्याचे बरेच अनेक चांगले परिणाम जाणवू लागतात. ही वस्तू घरात लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते असे म्हटले जाते. तसेच या वस्तूची ऊर्जा तुमच्या घरातील आनंद आणि सकारात्मक उर्जेशी देखील जोडते. ही फेंगशुईची वस्तू कोणती आहे आणि ती ठेवल्याने काय फायदे मिळतात. चला जाणून घेऊयात.
wind chime
घरात ‘ही एक’ गोष्ट लावा
फेंगशुईनुसार, जर पश्चिम दिशेची ऊर्जा चांगली असेल तर त्याचा परिणाम वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर स्पष्टपणे दिसून येतो. फेंगशुईची ती वस्तू आहे ‘विंड चाइम’ ज्याला काहीजण ‘वेल विशरही’ म्हणतात. विंड चाइम घरात लावणे खूप शुभ मानले जाते. जेव्हा वाऱ्यामुळे विंड चाइम वाजते तेव्हा त्यातून येणारा मधुर आवाज घराचे वातावरण शुद्ध करतो. तसेच, घरात काही नकारात्मक ऊर्जा असल्यास ती देखील हळूहळू नाहीशी होते. पश्चिम दिशेला विंड चाइम लावल्याने त्याची ऊर्जा सुधारते. म्हणूनच फेंगशुईमध्ये याची शिफारस जास्त केली जाते.
या गोष्टीही पश्चिम दिशेला ठेवू शकता
तुमच्या घराच्या पश्चिमेकडील भागाची ऊर्जा वाढवण्यासाठी, इतरही काही गोष्टींचा वापर करू शकता, जसं की चांदी, सोने किंवा पांढऱ्या वस्तूंनी तो कोपरा सजवू शकता. याव्यतिरिक्त, मुलांशी संबंधित वस्तू देखील येथे ठेवता येतात. जर तुम्ही कलाप्रेमी असाल तर या क्षेत्राशी संबंधित वस्तू या दिशेने ठेवल्याने शुभ परिणाम मिळतील. जुन्या किंवा तुटलेल्या वस्तू कधीही या दिशेला ठेवू नका. तसेच, येथे काळ्या किंवा गडद रंगाच्या वस्तू ठेवणेही टाळा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)