मला टार्गेट वर्ग करतात,कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे,पण माझ्या ऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासला टार्गेट करावा,असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. गेल्या 9 वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास विरोधकांना करता आला नाही त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे आपण आणलेल्या विकास कामे देखील पूर्ण झाले नाहीत,त्यावर विरोधकांनी बोलायला हवं,असा आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केला आहे.ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीतील आणि ईश्वरपुर मधील सर्व विरोधक जयंत पाटलांच्या विरोधात एकवटले आहेत,त्यामुळे चुरशीने निवडणूक पार पडत आहे.
Live: उरुण-ईश्वरपुरसाठी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखलनगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.उरुण ईश्वरपूरनगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत.त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे.
Live: महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठकमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मुंबईत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मनसेचे वरिष्ठ नेते उपस्तित आहे. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्ड ची चाचपणी मनसेकडून करण्यात येत आहे
Nanded Live: राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लोहा नगरपालिकेत भाजपाचे तगडे आव्हाननांदेड जिल्ह्यात 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गैरसमजल्या जाणाऱ्या लोहा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आह. नगराध्यक्षपदासह एकूण वीस जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मागच्या वेळेस या नगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. नगराध्यक्ष पद देखील भाजपाकडे होते. आताचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे तेव्हा भाजपाचे खासदार होते. परंतु आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि ते लोहा कंधार या विधानसभेचे आमदार झाले. त्यामुळे आता या मतदारसंघाचे राजकीय चित्र पूर्णता बदलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गड समजल्या जाणाऱ्या लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत आता त्यांना भाजपाचे तगडे आव्हान असणार आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी देखील लोहा, कंधार या नगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पूर्ण लक्ष असल्याने हे निवडणूक महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच होणार असं चित्र सध्यातरी निर्माण झालेल आहे.
Gwalior Accident: ग्वालियर येथील अपघातात पाच जणांचा मृत्यूमहाराजपुरा येथील मालवा कॉलेजजवळ कार आणि ट्रॅक्टरची धडक झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.
Delhi Live: ईडीकडून ७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, गुन्हेगारी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आर्थिक नोंदी जप्तदिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाने १४ नोव्हेंबर रोजी दिल्ली, एनसीआर आणि जयपूरमधील पाच ठिकाणी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार, मोठ्या अंमली पदार्थ तस्करी आणि मनी लाँडरिंग नेटवर्कच्या तपासासाठी शोध मोहीम राबवली. या मोहिमेत ईडीने ७० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड, गुन्हेगारी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आर्थिक नोंदी जप्त केल्या आहेत.
Mumbai Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशननेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याच्या धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तात्काळ परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
Mumbai Live Update: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची बैठकमनसेच्या बैठकीला प्रारंभ झाला असून, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अभिजीत पानसे उपस्थित आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डची तपासणी मनसेकडून सुरू आहे.
Lepord Live Update: कुडाळमध्ये बिबट्याची दहशतकुडाळ-नेरुर दुर्गावाड येथे आज पहाटेच्या वेळी बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या बकरींवर हल्ला केला, ज्यामुळे दोन बकरींचा मृत्यू झाला. आजीम मुजावर यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन बकरे लगेचच मारले. अचानक अंधारातून हल्ला करणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी फिरणे धोकादायक बनले आहे.
माजलगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत खलील पटेल यांचे नाव जाहीर केले आहे. आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणा स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
- नागपुरात काटोल मार्गावरील फेट्री येथे पहाटे 4 वाजताच सुमारास गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, 20 पेक्षा जास्त गोवंशचा मृत्यू, ट्रक चालक ट्रक सोडून फरार
- गोवंश घेऊन जाणारा ट्रकच्या चक्क्याला आग लागुण ट्रकने घेतला पेट,
- कळमेश्वर भागाकडून आलेला हा ट्रक पुढ्या मध्यप्रदेशकडे कत्तल खाण्यासाठी जात असल्याचा गावकऱ्यांचा संशय
- ट्रक पंचर झाला असताना ट्रक चालकाने ट्रक चालतवत राहिल्याने, चक्क्यातून ठिणगी निघत आग लागल्याचा संशय
- ट्रक लागल्यावर गावकऱ्यांनी भिजवण्याचा प्रयत्न करत पाच ते सात जनावरांना बाहेर काढण्यात यश मात्र इतर 30 ते 35 जनावर दगावल्याची माहिती
- पोलीस आता ट्रक नेमका कोणाचा होता कुठून कुठे चालला होता याचा शोध कळमेश्वर पोलीस घेणार आहे.
- मात्र रात्रीच्या अंधारात गोवंशा तस्करीचा खेळ चालतो का याचाही शोध घेणे गरजेचे आहे
Pune Live : पुण्यातील मनसेचे नेते घेणार राज ठाकरेंची भेटराज ठाकरे यांनी मागच्या बैठकीत पुणे शहरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांवर व्यक्त केली होती नाराजी
बूथ लेव्हल एजंट यांनी केलेल्या मतदार यादीच्या कामाबाबत राज ठाकरे यांनी सांगितले होते काही बदल
दुरुस्ती करून पुन्हा मनसे चे पुणे शहरातील नेते हा अहवाल उद्या राज ठाकरे यांना सादर करण्याची शक्यता
Dharashiv Live : धाराशिव नगरपरिषदसाठी तब्बल 299 अर्जधाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण तापु लागले आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असुन 15 नोव्हेंबर रोजी अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.आत्तापर्यंत आठपैकी सात नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी तब्बल 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Mumbai Live: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी गतीमान! शिवतीर्थवर महत्वाची बैठकमुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हालचाली वेगवान केल्या आहेत. आज शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने वार्डनिहाय रणनीती, संभाव्य उमेदवारांची चर्चा आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी मनसेकडून जोरदार पावले उचलली जात असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून मिळत आहे.
Nagpur Live: नागपूरमध्ये मोठी राजकीय हालचाल! माजी आमदार बळीराम भाऊ शिरस्कार भाजपात प्रवेश; स्थानिक राजकारणात चर्चांना उधाणनागपूर : बाळापूरचे माजी आमदार बळीराम भाऊ शिरस्कार यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणाला अचानक वेग आला आहे. नागपूरमधील आमदार निवास येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिरस्कार यांच्या प्रवेशामुळे बाळापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे, त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून या प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
Bhandara News : दोन ट्रकची भीषण धडक, भंडारा-तुमसर महामार्गावर वाहनांच्या रांगाभंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. भंडाऱ्यावरून तिरोडा दिशेने कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात भंडारा - तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथे घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे घडलेल्या अपघातानंतर तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. यामुळे पहाटे प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
Political News : उलटफेर झाल्यास आम्हाला जबाबदार धरू नका, आमदाराचा भाजप-राष्ट्रवादीला इशाराउलटफेर झालं तर आम्हाला जबाबदार धरू नका, महेंद्र दळवी यांचा भाजप राष्ट्रवादीला इशारा आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसऱ्याचा पक्ष घेऊन बुडायचं हा ट्रेंड रायगडच्या राजकारणात एका कुटुंबाच्या माध्यमातून आला असल्याची टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता केली. आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यास तयार आहोत पण बदलत्या राजकारणात काही उलटफेर झालं तर त्यांनी आम्हाला दोष देऊ नये असा इशाराही आमदार दळवी यांनी दिला.
NCP News राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामाराष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या तोंडावरती विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी चे नेते योगेश क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बीड नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी हस्तक्षेप करत स्वतः पॅनल उभा करून सर्व सूत्रे यांच्या हाती घेतल्याने योगेश क्षीरसागर नाराज झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
Kopargaon: नरभक्षक बिबट्यालाठार मारण्यात यशकोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आलं आहे. काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाने कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यानं एकाच आठवड्यात दोन बळी घेतले होते. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा संभाजीनगरचा महत्त्वाचा दौरा आहे. काही नेत्यांचा प्रवेश सोहळा आज होणार होता मात्र प्रदेशाध्यक्षांना दिल्लीला जावं लागलं असल्याने प्रवेश सोहळा रद्द करण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्री संवाद साधतील