Fertility Problem : आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतात. सध्या तर असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एक महिला नियमितपणे तपासण्या करण्यासाठी गेल होती. डॉक्टरांनी तिच्या पोटात असं काही सापडलं आहे, की ते पाहून डॉक्टरसुद्ध चकित झाले आहेत. आता या महिलेचं नेमकं काय करायचं? तिच्यावर नेमका कोणता उपचार करायचा? असा विचार डॉक्टर करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना इजिप्त येथील आहे. येथे एका महिलेच्या पोटात तब्बल नऊ गर्भ सापडले आहेत. अल अरबिया वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार एक महिला नियमितपणे अल्ट्रासाऊंड करायला डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरांनी तिची चाचणी केली. परंतु समोरच्या मशीनने चकित करणारे रिपोर्ट दिले. एका महिलेच्या पोटात तब्बल एक, दोन नव्हे तर नऊ गर्भ आढळले आहेत. समोर आलेला हा प्रकार काही सामान्य बाब नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. विशेष म्हणजे हा रिपोर्ट पाहून खुद्द त्या महिलेला आणि तिच्या पतीलाही विश्वास बसला नाही. याच दुर्मिळ घटनेबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ वाईल अल-बन्नो यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही एक दुर्मिळ अशी बाब मानली जाते. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या महिलेच्या पोटात असलेल्या गर्भांची संख्या कमी करता येऊ शकते, असे वाईल अल बन्नो यांनी सांगितले आहे. गर्भांची संख्या कमी करून पोटातील बाळाची तसेच महिलेच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
एका महिलेच्या पोटात 9 गर्भ कसे असे विचारले जात आहे. परंतु महिलांमध्ये असलेल्या अंडाशयाला (ओव्हरी) उत्तेजित करणारी काह औषधं घेतली तर अशा स्थितीत अंडाशयातून एकापेक्षा अनेक बिजांडे बाहेर पडू शकतात. त्यालाचा हायपरओव्ह्यूलेशन असे म्हटले जाते. एखाद्या आजारावर उपचार घेतला जात असेल आणि त्यासाठी काही औषधं घेतली जात असतील तर अशा स्थितीत हायपर ओव्ह्यूलेशन होऊ शकते. कधी-कधी 10 ते 20 बिजांडेदेखील फलनासाठी अंडाशयातून येऊ शकतात. अशा स्थितीत डॉक्टरांकडून एकच गर्भ ठेवून इतर गर्भ हटवले जातात.