ज्या वयात इतर मुलं विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा खेळत असतात त्या वयात वैभव सूर्यवंशी याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. वैभवने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएल पदार्पण करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने राजस्थान रॉयल्सकडून 18 व्या मोसमातून आयपीएल पदार्पण केलं. वैभवने 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. वैभवने त्याआधी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मात्र वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभव तेव्हापासून सातत्याने बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. त्यामुळे वैभव लवकरच सिनिअर टीम इंडियात खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. वैभवचा दांडपट्टा...