रात्रभर धिंगाणा घालायची शेजारची बाई, मुलीने असा बदला घेतला की… लोकही करू लागले कौतुक!
Tv9 Marathi November 17, 2025 03:45 AM

कल्पना करा, तुम्ही अभ्यास करत आहात, उद्या तुमची महत्त्वाची परीक्षा आहे आणि नेमके त्याच वेळी शेजारच्या खोलीतून मोठ्याने गाणी लावली आहेत. या गाण्यांच्या आवाज भिंत देखील व्हायब्रेट होऊ लागली आहे. अशा वेळी राग तर येईलच, पण समजावून सांगितल्यावरही समोरची व्यक्ती तुमचे ऐकत नसेल तर, तर माणूस असा प्लॅन बनवतो की त्याची आठवण येताच तो स्वतःच हसतो. असाच मजेशीर बदला घेतला मुलीने घेतला आहे. तिच्या शेजारी एका अतिशय हट्टी आणि निष्काळजी महिला होती. तिला धडा शिकवण्यासाठी मुलीने जे काही केले त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

खरं तर, महिलेने तिचा अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये तिच्या वसतिगृहात सारा नावाची शेजारणी राहायची. सारा वाईट नव्हती, फक्त खूपच उत्साही आणि निष्काळजी होती. दररोज रात्री ती 1 ते 2 वाजेपर्यंत इतक्या मोठ्याने गाणी लावायची की बाकीच्या रूममेट्सना झोपही यायची नाही. तिला अनेकांनी आवाज कमी करण्यास सांगितले, पण ती हसून म्हणायची- “आराम करा, हे कॉलेज आहे!”

Loud music at 2am? I found the perfect way to shut her up
byu/Lesleysmith09 inpettyrevenge

परीक्षेपूर्वी शेवटचा प्रयत्न

दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा अत्यंत महत्त्वाची परीक्षा होती. तिने साराच्या दारात जाऊन विनवणी केली की फक्त एका रात्रीसाठी आवाज कमी कर. पण साराने उलट गाणी आणखी मोठा आवाज करुन लावली. मुलगी संपूर्ण रात्र भींतीकडे रागाने जागत राहिली आणि परीक्षेची तयारीही नीट करू शकली नाही.

बदल्याची सुरुवात

परीक्षा संपताच मुलीने ठरवलं की आता तीही साराला तिच्याच भाषेत उत्तर देईल. तिला माहीत होतं की सारा सकाळी उशिरा उठते आणि १२ वाजेपर्यंत झोपणे तिला सर्वात आवडतं. म्हणून तिने सकाळी 6:30 वाजता अलार्म लावला, नंतर आपलं ब्लूटूथ स्पीकर भिंतीला टेकवून खूप मोठे गाणे वाजवू लागली. हॉलमध्ये पूर्ण शांतता असल्यामुळे आवाज थेट साराच्या खोलीत जायचा. पहिल्याच सकाळी सारा रागाने तडफडत बाहेर आली. दुसऱ्या दिवशी तिचे डोळे सुजलेले होते. तिसऱ्या दिवशी तिला कळलं की तिने काय चूक केली होती आणि ती विनवणी करत म्हणाली- “कृपया बंद करा, मी कंटाळले आहे!” मुलीने हसून तीच ओळ पुन्हा सांगितली- “आराम करा, हे कॉलेज आहे!” त्यानंतर साराचे रात्री उशिरापर्यंतचे गाणी लावण्याचे कार्यक्रम कायमचे बंद झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.