आधी कुटुंबावर टीका, आता सर्वात धक्कादायक निर्णय, रोहिणी आचार्य यांनी थेट देश…
Tv9 Marathi November 17, 2025 03:45 AM

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात झालेल्या वादानंतर लालू प्रसाद यांच्या तीनही मुली पटणा सोडून गेल्या आहेत. तिघीही कुटुंब आणि मुलांसह दिल्लीला रवाना झाल्या आहेत. रागिणी, राजलक्ष्मी आणि चंदा यादव दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. लालूंची आणखी एका मुली रोहिणी आचार्यने तर थेट देश सोडला असल्याचे समोर आले आहे. रोहिणी काल संध्याकाळी पक्ष आणि कुटुंब सोडून रडत रडत दिल्लीला पोहोचली होती. त्यानंतर तिने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रोहिणी आचार्य नेमकं कुठे गेली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिहार निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात टोकाचे वाद सुरु आहेत. त्यांची मुलगी रोहिणी आचार्यने कुटुंबीयांकडून अपमान झाल्याचे सांगितले. या अपमानानंतर तिने पक्ष सोडला आहे. मुलगा तेज प्रताप यादवला लालू यादव यांनी आधीच पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले होते. आता रोहिणी आचार्यनेही कुटुंब आणि राजकारण सोडले आहे. तिने संजय यादव आणि रमीजवर दबाव टाकल्याचा आरोप केला. सोबतच एक्स पोस्टद्वारे तेजस्वी यादववरही गंभीर आरोप केले. रोहिणीचे दुःख पाहून तेज प्रतापही भडकले आहेत. शनिवारी त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की- ज्याने आमच्या बहिणीचा अपमान केला, त्याच्यावर सुदर्शन चक्र चालेल.

रोहिणी आचार्यने काय आरोप केले?

शनिवारी घर सोडल्यानंतर रोहिणी आचार्यने म्हटले की, “त्यांचे कोणतेही कुटुंब राहिलेले नाही. त्यांनीच मला घरातून बाहेर काढले आहे. संजय-रमीजचे नाव घेतल्यावर त्रास दिला जातो.“ रोहिणी आचार्यने राजकारण सोडण्याबाबत म्हटले, “माझे कोणतेही कुटुंब नाही. त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढले आहे. त्यांना जबाबदारी घ्यायची नाही. संपूर्ण जग प्रश्न उपस्थित करत आहे की पक्षाची अशी स्थिती का झाली आहे?” रोहिणी आचार्य यांनी देश सोडला असून त्या सिंगापूरला गेल्या असल्याचे म्हटले जात आहे.

तेजस्वी यादवविरुद्ध मोर्चा

रोहिणी आचार्यने आपल्या एक्स हँडलवर लिहिले की, “काल मला शिवीगाळ करून सांगितले गेले की मी घाणेरडी आहे आणि मी माझ्या वडिलांना माझी घाणेरडी किडनी दिली, कोट्यवधी रुपये घेतले, तिकीट घेतले तेव्हा घाणेरडी किडनी दिली.. सर्व मुली-बहिणींना, ज्या लग्न झालेल्या आहेत, त्यांना सांगेन की तुमच्या माहेरी कोणता भाऊ असेल, तर चुकूही तुमच्या देव रूपी वडिलांना वाचवू नका, तुमच्या भावाला, त्या घरच्या मुलाला सांगा की, आपली किंवा त्याच्या हरियाणवी मित्राची किडनी वडिलांना लावून घ्या” .. सर्व बहिणींनी आपले घर-कुटुंब पहा, आपल्या आई-वडिलांची पर्वा न करता आपल्या मुलांना, आपले काम, आपले सासरचे घर पहा, फक्त स्वतःबद्दल विचार करा… माझ्याकडून तर हे मोठे पाप झाले की मी माझे कुटुंब, माझ्या तिघा मुलांना पाहिले नाही, किडनी देताना न माझ्या पतीची, न माझ्या सासरच्या घरी परवानगी घेतली… आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मी ते केले, आज तेच घाणेरडे होते असे सांगितले गेले.. तुम्ही सर्व माझ्यासारखी चूक कधीही करू नका, कोणत्याही घरात रोहिणी सारखी मुलगी येऊ नये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.