विद्यार्थ्यांनी फुलवली 'टेक्नो-परसबाग'
esakal November 17, 2025 03:45 AM

04688
साळिस्ते ः कणकवली तालुकास्तरीय परसबागेत स्पर्धेत जिल्हा परिषद साळिस्ते क्र. १ शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.


विद्यार्थ्यांनी फुलवली ‘टेक्नो-परसबाग’

साळिस्ते शाळेचा स्पर्धेत ठसा; शिक्षणाबरोबर कष्ट-कमाईचाही आदर्श

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १६ : प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत कणकवली गटाकडील कणकवली तालुकास्तरीय परसबाग स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळिस्ते क्र. १ या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेचे अभिनंदन केले जात आहे.
या स्पर्धेत साळिस्ते क्र. १ शाळेने परसबाग लागवडीसाठी मल्चिंग पेपर, वेलींच्या वाढीसाठी नेट, आधुनिक ठिबक सिंचनचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, मायक्रो ग्रीन, गांडूळ खताची निर्मिती, यामुळे कारली, दुधी भोपळा, काकडी, भोपळा, टोमॅटो, मिरची भेंडी, वाल अशा विविध फळभाज्यांची लागवड केली. तसेच पालेभाज्या, औषधी वनस्पतींचीही लागवड केली. शाळेच्या पोषण आहारामध्ये आठवड्यातून तीनपेक्षा जास्त दिवस भाज्यांचा वापर केला. विद्यार्थ्यांनी सुमारे दहा हजाराची भाजी विक्रीही केली. दिवाळी सुटीमध्येही मुलांनी व पालकांनी परसबागेची काळजी घेतली. अब्दुल बागेवाडी यांनी परसबाग लागवडीसाठी विशेष मार्गदर्शन केले. तसेच ठिबक सिंचन पाईप मोफत जोडून दिले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर यांनी ट्रॅक्टरने नांगरणी करून दिली.
कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, केंद्रप्रमुख संजय पवार यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संजना ठाकूर, पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये, प्रतिष्ठा तळेकर, अंगणवाडी सेविका दीपाली गुरव यांनी विशेष मेहनत घेतली. सरपंच प्रभाकर ताह्मणकर, उपाध्यक्ष गजानन रामाणे, शिक्षणप्रेमी संतोष पाष्टे आदींनी शाळेच्या या यशाचे कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
---
सुमारे दहा हाजाराच्या भाजीची विक्री
मल्चिंग पेपर, वेलींच्या वाढीसाठी नेट, आधुनिक ठिबक सिंचनचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, मायक्रो ग्रीन, गांडूळ खताची निर्मिती, यामुळे कारली, दुधी भोपळा, काकडी, भोपळा, टोमॅटो, मिरची भेंडी, वाल अशा विविध फळभाज्यांची लागवड केली. तसेच पालेभाज्या, औषधी वनस्पतींचीही लागवड केली. शाळेच्या पोषण आहारामध्ये आठवड्यातून तीनपेक्षा जास्त दिवस भाज्यांचा वापर केला. विद्यार्थ्यांनी सुमारे दहा हजाराची भाजी विक्रीही केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.