उत्तर कोरियाला टक्कर देण्यासाठी द.कोरियाचे मोठे पाऊल, अमेरिकेसोबत केला मोठा करार
GH News November 16, 2025 10:10 PM

उत्तर कोरियाच्या वाढत्या आण्विक पाणबुड्या आणि अण्वस्र चाचण्यांमुळे दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाला अमेरिकेने आण्विक संचालित अटॅक सबमरिन बनवण्यासाठी करार केला आहे. व्हाईट हाऊसच्या मते अमेरिकेने दक्षिण कोरियाला न्यूक्लिअर अटॅक सबमरीन बनवण्यासाठी परवानगी दिली आहे. या करारानुसार अमेरिका या पाणबुड्यांना इंधन देणार आणि तंत्रज्ञान देखील पुरवणार आहे.

जगात सध्या केवळ ६ देशांकडेच आण्वि्क संचालित पाणबुडी आहे. यात अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि भारताचा समावेश आहे. दक्षिण कोरियाच्या जवळ २० पाणबुड्या आहेत, परंतू त्या सर्व डीझेलवर चालतात. या पाणबुड्यात वारंवार पाणी वरुन आणावे लागते. न्युक्लिअर सबमरीन वेगवान आणि शक्तीशाली आणि दीर्घकाळ पाण्यात राहण्यासाठी सक्षम असतात.

दोन्ही देशात गेल्या महिन्यात झाली ट्रेड डील

सामंजस्य करारानुसार दोन्ही देशात गेल्या महिन्यात ट्रेड डील झाली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच वर्षी दक्षिण कोरियावर २५ टक्के टॅरिफ लावला होता. राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांनी यास १५ टक्के कमी करायला लावले. या बदल्यात दक्षिण कोरियाने सांगितले की तो अमेरिकेत ३५० अब्ज डॉलर गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक २०० अब्ज रोकड आणि १५० अब्ज शिपबिल्डिंग मध्ये होणार आहेत.

दक्षिण कोरियात याची गरज का ?

उत्तर कोरियाने अलिकडेच त्यांची आण्विक पाणबुडी तयार करण्यास सुरुवात केली आहे, त्यांनी मार्च २०२५ मध्ये याचे फोटो जारी केले होते. असे म्हटले जात आहे की रशिया यात उत्तर कोरियाला मदत करत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली यांनी APEC परिषदेत सांगितले की त्यांना उत्तर कोरियाचा सामना करण्यासाठी न्युक्लिअर सबमरीनची गरज लागणार आहे.

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यु-बॅक यांनी सांगितले की आण्विक पाणबुड्या देशाचा गौरव असतील. त्यामुळे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन चिंतेत राहातील.उत्तर कोरियाकडे सुमारे ५० आण्विक अस्रे असण्याचा अंदाज आहे. आणि तो येत्या काही वर्षात स्वत:ची पाणबुडी तयार करु शकतो.

अमेरिकेला काय मिळणार ?

अमेरिकेची इच्छा आहे की दक्षिण कोरियाने उत्तर कोरिया आणि चीनवर दबाव वाढवण्यात त्यांची मदत करावी. तज्ज्ञांच्या मते दक्षिण कोरियाच्या क्षेत्रात अमेरिकेचा महत्वाचा साथीदार बनू शकेल.

आता पुढे काय होणार ?

ट्रम्प यांनी म्हटले आहे की या पाणबुड्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे बांधल्या जातील, जिथे दक्षिण कोरियाची कंपनी हानव्हा ( Hanwha ) यांचे शिपयार्ड आहे. तसेच, फिलाडेल्फिया शिपयार्डमध्ये क्षमता नसल्याने या पाणबुड्या त्यांच्या देशातच बांधल्या पाहिजेत असा दक्षिण कोरियाचा आग्रह आहे.

दक्षिण कोरियाचे पंतप्रधान किम मिन-सोक काय म्हणतात

दक्षिण कोरिया पंतप्रधानमंत्री किम मिन-सोक यांनी सांगितले की फिलाडेल्फियाचा शिपयार्ड या स्तराची पाणबुडी बनवू शकत नाही. आता दोन्ही देशांना न्युक्लिअर फ्युल करार अपडेट करावा लागेल. त्यामुळे अमेरिका दक्षिण कोरियाला न्यूक्लिअर फ्यूएल पुरवठा करु शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.