दक्षिण अफ्रिकेने पहिला कसोटी सामन्यातील विजय भारताच्या खेचून आणला. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने भारताला विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताने फक्त 93 धावा केल्या आणि 30 धावांनी पराभव झाला. या सामन्यात भारताची फलंदाजीची अक्षरश: नाचक्की झाली. इतकंच काय तर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. असं असताना या सामन्यातील पहिला दिवस वेगळ्याच कारणाने गाजला होता. दक्षिण अफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात टेम्बा बावुमा फलंदाजीला आला तेव्हा जसप्रीत बुमराहने केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. टेम्बा बावुमाच्या पॅडवर चेंडू आदळला आणि जोरदार अपील करण्यात आलं. पण पंचांनी नकार दिला. असं असताना डीआरएसबाबत चर्चा करताना बुमराह पंतशी बोलताना बावुमच्या उंचीवरून वक्तव्य केलं. यानंतर वादाला फोडणी मिळाली.
जसप्रीत बुमराह आणि टेम्बा बावुमाचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार दावा केला जात आहे की, दक्षिण अफ्रिकेच्या विजयानंतर जसप्रीत बुमराहने टेम्बा बावुमाची माफी मागितली. व्हिडीओनुसार, जसप्रीत बुमराह बावुमाच्या खांद्यावर हात ठेवून बोलत आहे. त्यानंतर टेम्बासोबत हात मिळवला आणि निघून गेला. या व्हिडीओतून काही जणांनी असा अर्थ काढला आहे की, बुमराहने आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरमी टेम्बाला सॉरी म्हंटलं आणि स्पष्टीकरण दिलं. पण याबाबत खरं काय ते समोर आलेलं नाही. पण नेटकरी या दोघांचं बोलणं तसंच झालं असावं असा अर्थ काढत आहेत.
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा या विजयाचा शिल्पकार ठरला. कारण त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे विजयाची स्क्रिप्ट लिहिली गेली. इतकंच काय तर कॉर्बिन बॉशसोबत 44 धावांची भागीदारी केली. याचा फायदा दक्षिण अफ्रिकेला झाला. त्यामुळे भारतासमोर 124 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं. इतकंच काय तर फिल्डिंग करताना अक्षर पटेलचा कठीण झेल पकडला. कारण त्या षटकात त्याने 16 धावा काढल्या होत्या. त्याच्या झेलमुळे टीम इंडियाचा खेळ 93 धावांवर आटोपला. 15 वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेने भारतात कसोटी सामना जिंकला आहे.