आपण आरोग्यदायी आणि आनंदी राहिलं पाहिजे असं जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये, कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या निर्माण होऊ नये, अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र जीवनात आपनं अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे आजार होतात, तेव्हा तो व्यक्ती हा वेळेच्या खूप आधीच म्हातारा होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या आजही अनेकांना आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात अशाच काही नीतींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे माणूस हा हळुहळु म्हातारा होतो, त्याच आयुष्य देखील कमी होतं.
चाणक्य म्हणतात की जे लोक गरजेपेक्षा जास्त फिरतात, जे लोक सातत्यानं आपल्या आयुष्यात प्रवास करत असतात. ते लोक वेळेपूर्वीच म्हातारे होतात. असं का घडतं? तर प्रवासादरम्यान ते स्वत:ची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाहीत, त्यांचं रूटीन एकसारखं राहत नाही, त्यामुळे त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. प्रवासामध्ये अनेकदा जेवणाकडे र्दुलक्ष होतं, त्यामुळे अशा लोकांना अनेक आजार होण्याची शक्यता असते, यामुळे त्यांचं शरीर कमजोर होतं आणि हे लोक वेळेपूर्वीच म्हातारे होतात.
हे लोक राहतात कायम आरोग्यदायी
चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये उत्तम आरोग्याची देखील अनेक लक्षणं सांगीतलेली आहेत, चाणक्य म्हणता जे व्यक्ती आपलं रूटीन व्यवस्थित पाळतात, जे कधीच आपल्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करत नाहीत, जे लोक नियमित व्यायाम करतात. आहारामध्ये सकस आणि जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचा समावेश करतात, ते लोक कायम आरोग्यदायी राहतात. मात्र तुम्ही जर तुमच्या आरोग्याकडे दूर्लक्ष केलं तर तुम्ही वेळेपूर्वीच म्हातारे होऊ शकतात, तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)