थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ?
GH News November 17, 2025 11:11 PM

थायरॉईड पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल जसे पीरियड्स, प्रेग्नंसी आणि मोनोपॉज. थायरॉईड एक ग्रंथी असून जी हार्मोन बनवून शरीरातील एनर्जी, मेटाबॉलिज्म,हृदयाची धडधड आणि मूडला नियंत्रित करते. याचे दोन मुख्य प्रकार असतात. हायपोथायरॉईडिज्म म्हणजे हार्मोन कमी बनने आणि हायपरथायरॉयडिज्म म्हणजे हार्मोन्सची निर्मिती अधिक होणे. जेव्हा हे अनियंत्रित होते तेव्हा शरीरातील अनेक प्रक्रीया प्रभावित होतात. त्यामुळे रामदेव बाबा यांनी सांगितलेली योगासने थायरॉईडमध्ये लाभदायक ठरु शकतात.

थायरॉईड समस्या अनेक कारणांनी होऊ शकते. सर्वात मोठे कारण ऑटोईम्यून डिसऑर्डर आहे. ज्यात शरीराची इम्युनिटीच थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करु लागते. याशिवाय आयोडिनची कमतरता, अनियमित दिनचर्या, तणाव, कुटुबांतील या आजाराचा इतिहास आणि हॉर्मोनल असंतुलन यामुळे हा आजार वाढू शकतो. थायरॉईडच्या लक्षणात वजन घटणे, हृदयाच्या धडधड वाढणे, घाबरल्या सारखे वाटणे, झोपेची कमतरता, केस गळणे, थंडी जास्त वाजण आणि बद्धकोष्ठता अशी सर्वसामान्य लक्षणे आहेत. वेळेवर निदान आणि योगासनाची मदत यामुळे या आजाराला बऱ्याच प्रमाणात नियंत्रित आणता येते.

थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायदेशीर ?

सूर्य नमस्कार

रामदेव बाबा यांच्या मते संपूर्ण शरीराला सुर्य नमस्कार एक्टीव्ह करतो. आणि ब्लड फ्लो चांगला बनतो. यामुळे गळा आणि मानेच्या खालच्या भागात हलका ताण येतो. जो थायरॉईड ग्रंथीच्या कामकाज सुधारण्यास मदत करतो. नियमित अभ्यासाने मेटाबॉलिझ्म वेगाने होते आणि एनर्जीची पातळी देखील वाढते.

भस्त्रिका प्राणायाम

भस्त्रिका प्राणायमात वेगाने आणि खोल श्वास घेण्याच्या प्रक्रियेने थायरॉईड ग्रंथीला अधिक ऑक्सिजन आणि एनर्जी मिळते. यामुळे शरीरातील ब्लड फ्लो सुधारतो आणि हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यास कशी मदत मिळते.यामुळे थकवा,आळस आणि तणाव सारख्या समस्या देखील कमी होतात.

कपालभाती

पोटाला आत खेचून श्वास सोडण्याच्या या तंत्राने पचन यंत्रणा सुधारते आणि मेटाबॉलिक रेट वेगाने वाढतो. ही बॉडीला स्लो हॉर्मोनल फंक्शन्सला एक्टीव्ह करते आणि थायरॉईड असंतुलन कंट्रोल करण्यास सहायक ठरते.यामुळे वजन नियंत्रणात देखील फायदा होतो.

सिंहासन

या आसनात गळ्या हलका ताण मिळतो,ज्यामुळे थेट थायरॉईड ग्रंथीला उत्तेजन मिळते. हे आसन तणाव आणि चिंता कमी करते, जे थायरॉईड असंतुलनाचे मुख्य कारण मानले जाते. नियमितपणे हे आसन केल्याने गळ्याचे स्नायू मजबूत होतात. आणि हॉर्मोनल संतुलन चांगले होते.

योग नियमित आणि रिकाम्या पोटी करावे

थायरॉईडची औषधे सुरु असताना त्यासोबत योगासने सपोर्ट म्हणून करावीत

तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, मनाला शांतता होईल असे वागावे

संतुलित डाएट, पुरेशी झोप आणि वेळेवर औषधे घेणे गरजेचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.