पालघर : पालघर येथील वाडा तालुक्यातील कोना ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एमआयडीसीत गादी कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीत काही कामगार भाजले आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही आग लागली असून या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. कारखान्यात मोठ्या प्रमाणे गादी बनवण्यासाठी लागणारा फोम असल्याने आगीचा मोठा भडका उडाला असून यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाले. तसेच आगीचं कारण अस्पष्ट आहे.