गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत घटस्फोट होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलंय. हेच नाही तर दररोज दिग्गज अभिनेत्री-अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येतात. मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत होती. त्यामध्येच आता 43 व्या वर्षी अभिनेत्रीने घटस्फोट घेतला. हेच नाही तर नुकताच अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. हैराण करणारे म्हणजे हा अभिनेत्रीचा तिसरा घटस्फोट आहे. अभिनेत्रीच्या घयस्फोटाची चर्चा मागील काही दिवस रंगताना दिसली. आता तिने पोस्ट शेअर करत अधिकृत घोषणा केली. अभिनेत्रीची पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला. मात्र, घटस्फोटाचे कारण अजून कळू शकले नाही.
मल्याळम अभिनेत्री मीरा वासुदेवनने सिनेमॅटोग्राफर विपिन पुथियाकम यांच्याशी घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली. मीरा वासुदेवन आणि विपिन यांचे लग्न गेल्या वर्षी मे महिन्यात कोइम्बतूर येथे झाले होते. लग्नाच्या अवघ्या एकाच वर्षात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णयच नाही तर कायदेशीर दोघे विभक्तही झाली आहेत.
अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले की, मी अभिनेत्री मीरा वासुदेवन… अधिकृतपणे जाहीर करते की मी ऑगस्ट 2025 पासून अविवाहित आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत आणि शांत टप्प्यात सध्या आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यात मीरा वासुदेवननेविपिन पुथियाकमसोबत घटस्फोट घेतला.
सध्या आयुष्यातील शांत टप्प्यात आहे, असे अभिनेत्रीने म्हटल्याने मागील काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठा तणाव असल्याचा अंदाज लावला जातोय. मीरा आणि विपिन यांची पहिली भेट कुडुम्बविलक्कु या मालिकेच्या सेटवर झाली होती, जिथे त्यांची व्यावसायिक मैत्री वैयक्तिक नात्यात बदलली. मात्र, त्यांचे हे नाते फार लवकर संपले. यापूर्वी अभिनेत्रीची दोन घटस्फोट झाले आहेत. पोस्टमध्ये अभिनेत्रीने म्हटले की, सध्या ती अविवाहित आहे. मात्र, मीरा आणि विपिन यांचा घटस्फोट नेमके कोणत्या कारणाने झाले, याबद्दलची माहिती मिळू शकली नाही.