अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील महानायक आहे. त्यांना बीग बी असं देखील म्हटलं जातं. असा एकही व्यक्ती नसेल ज्याला अमिताभ बच्चन यांचे चित्रपट आवडत नसतील. मात्र एक किस्सा असा देखील आहे, जो ऐकून स्वत: अमिताभ बच्चन भावुक झाले. एक गाव असं आहे, जिथे मुलाचा जन्म होताच अमिताभ बच्च यांचा चित्रपट पाहिला जातो, हे जेव्हा अमिताभ बच्चन यांना समजलं तेव्हा ते चांगलेच भावुक झाले. हे गाव आहे, बॉलिवूड अभिनेते जयदीप अहलावत यांचं, जयदीप अहलावत यांनी देखील अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. दरम्यान त्यांच्या गावात जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो, तेव्हा तेथील लोक अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पहातात. बाळ जन्माला आलं याचा आनंद अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहिल्याशिवाय पूर्णच होत नव्हता असं अहलावत यांनी सांगीतलं. जयदीप अहलावत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर आले, तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना हा किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा ऐकून अमितान बच्चन देखील चांगलेच भावुक झाले.
नेमकं काय म्हटलं जयदीप अहलावत यांनी?
माझ्या लहानपणी जेव्हा एखाद्या घरात बाळ जन्माला यायचं तेव्हा त्याचा आनंद संपूर्ण गाव साजरा करायचं, पण हा उत्सव अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहिल्याशिवाय पूर्णच होत नव्हता. जंजीर आणि डॉन सारखे चित्रपट मोठ्या आवडीने पाहिले जायचे, याच कारणामुळे मी अमिताभ यांचे अनेक चित्रपट तब्बल शंभर पेक्षा अधिक वेळा पाहिले आहेत. एवढंच नाही तर शोले चित्रपटाची ऑडिओ कॅसेट देखील आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती, मी जेव्हा लहान होतो, तेव्हा होळी, दिवाळी असे मोठे सण असले की आम्ही सर्वजण एकत्र जमत असू, आणि ती शोल चित्रपटाची ऑडिओ कॅसेट लावली जाई, संपूर्ण गाव ही कॅसेट काळजीपूर्णक पुन्हा -पुन्हा ऐकत राही, असंही यावेळी अहलावत यांनी म्हटलं.
अमिताभ बच्चन भावुक
दरम्यान कोन बनेगा करोडपतीच्या सेटवर जयदीप अहलावत यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून अमिताभ बच्चन देखील चांगलेच भावुक झाले. यासोबतच जयदीप यांनी आणखी काही किस्से देखील यावेळी सांगीतले.