पुणे : पीएमपीच्या ताफ्यात येत्या चार ते पाच महिन्यांत दोन हजार नवीन बस दाखल होणार आहेत. सद्य:स्थितीत असलेल्या दोन हजार बसची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात एकूण बसची संख्या चार हजार होणार आहे. बसची संख्या वाढणार असल्याने पीएमपी प्रशासनाने प्रवासीसंख्या जवळपास दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. पीएमपीची दैनंदिन प्रवासीसंख्या २० लाख होईल, या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने नियोजनाला सुरुवात केली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सद्यस्थितीत दोन हजार बस असल्या तरीही प्रत्यक्षात मात्र १६५० बस रस्त्यावर धावत आहेत. यातून दैनंदिन सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या अनेक दिवसांपासून पीएमपी प्रशासन प्रवाशांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र बसची संख्या मर्यादित असल्याने प्रवासी संख्या वाढविण्यास अडचणी येत होत्या. आता मात्र पीएमपी प्रशासनाला दोन हजार नवीन बस मिळणार आहेत.
Nagpur Crime : ‘तू मला आवडते’ म्हणत सतत त्रास देणाऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर वार केला; इमामवाडा पोलिसांनी नोंदवला गुन्हा!यात एक हजार ई-बस असतील तर एक हजार बस या सीएनजीवर धावतील. ई-बसला केंद्र सरकारची परवानगी मिळाली असून एप्रिल किंवा मे २०२६ पर्यंत या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. एक हजार सीएनजी बससाठी पीएमपी प्रशासनाने कार्यादेश देखील दिला आहे. त्याच्या निर्मितीला देखील सुरुवात झाली असून त्या देखील एप्रिल किंवा मे २०२६ पर्यंत पीएमपीला प्राप्त होतील.
प्रवासीसंख्या वीस लाख होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. मार्गांची संख्यासह डेपोंची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. बसची संख्या वाढल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
Malgaon Crime : मालेगाव हादरले! डोंगराळे येथे सव्वाचारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्दयीपणे खून; नराधमाला फाशी द्या, ५ तास रास्ता रोको मार्गांची संख्या वाढणारपीएमपीच्या १६५० बस सध्या शहराच्या विविध मार्गांवर धावतात. पीएमपीने यासाठी ३७१ मार्ग तयार केले आहेत. बसची संख्या वाढणार असल्याने या मार्गांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. प्राथमिक माहितीनुसार बस मार्गांची संख्या आणखी किमान ३०० ने वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक बस उपलब्ध होणार आहेत.
डेपोसाठी जागेचा शोधपीएमपीचे सध्या १७ डेपो आहेत. दोन हजार नवीन बससाठी आणखी १३ नवीन डेपो तयार करावे लागणार आहेत. पीएमपीने त्यासाठी ११७ एकर जागेची मागणी केली आहे. या जागेसाठी पीएमपीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र जागा उपलब्ध झाल्यानंतर चार ते पाच महिन्यांत डेपो बांधून तयार होणे अवघड आहे. तेव्हा डेपोची जागा मिळणे व डेपो बांधून तयार होणे हे काम खूप गतीने होणे आवश्यक आहे.