Pmc News : सुरक्षित कामकाजाविषयी कचरावेचकांना मार्गदर्शन; पुणे नॉलेज क्लस्टर, पुणे महापालिकेचा उपक्रम!
esakal November 20, 2025 11:45 PM

धायरी : सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी कचरा वेचक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात सुरक्षित कामकाज आणि संवादकौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे नॉलेज क्लस्टर आणि पुणे महापालिका यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत कचरा वेचकांच्या भूमिकेची ओळख, कचरा वर्गीकरणाचे महत्त्व, विविध प्रकारच्या कचऱ्याची हाताळणी, सुरक्षितता उपाय आणि कार्यक्षमतेत वाढ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

रंगकोडेड डस्टबिन प्रणाली, स्वच्छता पद्धती आणि सुरक्षा साहित्याचा योग्य वापर यावरही भर देण्यात आला. यानंतर ‘नागरिकांशी संवाद’ या विषयावर प्रत्यक्ष भूमिका सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देताना कोणत्या पद्धती प्रभावी ठरतात, प्लास्टिक कचऱ्याची माहिती, स्वच्छताविषयक जनजागृती आणि निरोगी सवयींबाबत मार्गदर्शन अशा विषयांचा समावेश होता.

Pune Success Story : गायत्री पोरेची झेप राज्यस्तरापर्यंत; ‘आरोग्य सुरक्षा यंत्र’ प्रकल्पाला इन्स्पायर्ड पुरस्कारात मानाचा तुरा!

तसेच गटकार्य, कार्यस्थळावरील शिस्त, संवाद कौशल्य, सक्रियपणे ऐकणे आणि तक्रारी योग्य प्रकारे मांडणे याबाबत कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ‘ई-श्रम’ नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार, उपअभियंता अजित सुर्वे, आरोग्य निरीक्षक रूपेश मते, कुणाल मते, सूर्यभान शिकरे, मोहिनी चालुक्य, प्रियांका महाले आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.