तळोज्यात दुचाकीस्वारांची घसरगुंडी
खारघर, ता. २० (बातमीदार) ः तळोजा सेक्टर दहा आणि अकराच्या मुख्य रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. या ठिकाणी वळण असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले असून बांधकाम व्यावसायिकावर पालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तळोजा सेक्टर दहा, अकरामधील मुख्य रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ असते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला किराणा, कापड, चप्पल, मोबाईल, ज्वेलर्स, हार्डवेअर अशा अनेक दुकाने आहेत. शिवाय, एनएमएमटी बसदेखील वाहतूक असते; पण मुख्य रस्त्यावरील रेती, खडी पसरलेली असल्याने दुचाकीचालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.