निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास कॉंग्रेस निवडून येईल ः संध्या सव्वालाखे
कल्याणमध्ये महिला कॉंग्रेसच्या वतीने महिला संमेलनाचे आयोजन
कल्याण, ता. २० (वार्ताहर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास राज्यात कॉंग्रेस निवडून येईल, असा विश्वास महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यातर्फे महिला संमेलन आयोजित केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपा सरकार महिलांचे संरक्षण करण्यास असमर्थ असल्याची टीका देखील सव्वालाखे यांनी केली. यावेळी महिला कॉंग्रेस कमिटी मुंबई व प्रदेश प्रभारी शिल्पी अरोरा, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सचिन नाईक, ब्रिज दत्त, उज्वला साळवे, महिला अध्यक्षा प्रज्योती हंडोरे, संभाजी नगर महिला कॉंग्रेस अध्यक्षा दिपाली मिसाळ, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. तर, ज्यांना निवडून येण्याची खात्री नसते ते भाजपमध्ये जात असून, तिथे मशीन तयारच आहे. फक्त बटण दाबायचं बाकी आहे. कॉंग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष असून कर्मठ कॉंग्रेस कार्यकर्ता कधीच पक्ष सोडून जाणार नाही. निवडणूक आयोगाने मशीन बंद करून बॅलेट पेपरवर घेतल्यास सर्व ठिकाणी कॉंग्रेसचा झेंडा फडकेल असे सव्वालाखे यांनी सांगितले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.