बदलापूर पालिका निवडणुकीची रंगत वाढली
esakal November 21, 2025 12:45 PM

बदलापूर पालिका निवडणुकीची वाढती रंगत
४९ जागांसाठी १६३ उमेदवार रिंगणात!
बदलापूर, ता. २० (बातमीदार) : १० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीने आता खरा रंग धरायला सुरुवात केली आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून, ४९ जागांसाठी एकूण १६३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या सहा अर्जांपैकी वंचित बहुजन आघाडीच्या रश्मी गव्हाणे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता पाच दमदार उमेदवार नगराध्यक्षपदासाठी थरारक शर्यतीत उतरले आहेत.

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असल्याने अंतिम संख्या थोडी बदलू शकते, पण सध्याची स्थिती पाहता लढत चांगलीच चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत मनसेने महाविकास आघाडीतून बाहेर पडणे आणि भाजप व शिंदे गटदेखील स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे राजकीय समीकरणांना मोठी अनिश्चितता आणि उत्कंठतेची धार आली आहे. नगराध्यक्षपदाच्या पाचही उमेदवारांची जोरदार तयारी पाहता बदलापूरची ही लढत अत्यंत रोमहर्षक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर असल्याने, रिंगणातील उमेदवारांची अंतिम संख्या किती होते याकडे आता बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.


उमेदवार पक्ष/गट
वीणा म्हात्रे शिवसेना (शिंदे गट)
रुचिता घोरपडे भाजप-राष्ट्रवादी (युती)
प्रिया गवळी महाविकास आघाडी
आस्था मांजरेकर आम आदमी पार्टी (आप)
संगीता चेंदवणकर अपक्ष


अर्ज छाननीनंतरचे चित्र :
एकूण दाखल अर्ज - २३०
बाद झालेले अर्ज - ५२
उमेदवार रिंगणात - १६३

पक्ष/गट उमेदवारांची संख्या
शिवसेना (शिंदे गट) ४९
भारतीय जनता पक्ष (भाजप) ४०
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट २१
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ८
राष्ट्रवादी (शरद पवार गट) ४
काँग्रेस ३
मनसे, अपक्ष आणि इतर पक्ष ३८
एकूण १६३

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.