swt207.jpg
05618
श्री देव गांगेश्वर
गवाणेत १ डिसेंबरला
अखंड हरिनाम सप्ताह
तळेरे : गवाणे (ता. देवगड) गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव गांगेश्वराचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह १ डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. प्राचीन परंपरा लाभलेल्या गवाणे गावचे ग्रामदैवत श्री शंकराचे रुप अशी ख्याती, कीर्ती लाभलेला श्री देव गांगेश्वर दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या उत्सवादरम्यान सकाळी ७ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह अखंड हरिनामाला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत स्थानिक वारकरी भजने, त्यानंतर पंचक्रोशीतील भजनांचा कार्यक्रम होणार आहे. मध्यरात्री पौराणिक देखाव्यांसह पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन गवाणे ग्रामविकास मंडळ, मुंबई तसेच ग्रामस्थ मंडळी, गवाणे यांनी केले आहे.