भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठा भूकंप, कोलकातामध्ये जोरदार धक्के, तब्बल 20 सेकंद जमीन..
GH News November 21, 2025 02:11 PM

भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठा भूकंप आला. बांगलादेशची राजधानी ढाका येथे तीव्र भूकंप झाला आहे. शुक्रवारी सकाळी ढाका आणि त्याच्या आसपासच्या भागात अचानक जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भारताच्या पश्चिम बंगालमध्येही काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तान आणि बांगलादेशात भूकंपाची तीव्रता अधिक आहे. कोलकातासह अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बांगलादेशातील तुंगीपासून सुमारे 27 किलोमीटर पूर्वेला भूकंप झाला आणि बंगालपर्यंतही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवली आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:38 वाजता भूकंपाची नोंद झाली. युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्रानुसार, अनेक भागातून सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचे वृत्त आले आहे.

सुमारे 20 सेकंद जमीन हादरत होती

या भूकंपाची तीव्रता 5.7 होती. हा भूकंप झाला आणि सुमारे 20 सेकंद जमीन हादरली. भूकंपामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोक घर सोडून बाहेर पळाली. काही तासांपूर्वी पाकिस्तानलाही भूकंपाचे धक्के बसले होते. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र पृष्ठभागापासून 135 किलोमीटर खाली आहे.

पाकिस्तान, अफगाणिस्तानात मोठा भूकंप 

खोलीवर येणारे भूकंप थेट पृष्ठभागावर परिणाम करत नाहीत आणि सामान्यतः कमी नुकसान करतात. पाकिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या अनेक भागातही जाणवले. बंगालमधील मालदा, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर आणि हुगळी यासह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्रिपुराच्या अनेक भागातही जाणवले. काही तासांच्या आतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाणवले आहेत. त्यामध्येच भारताच्या पश्चिम बंगालमध्ये धक्के जाणवले.

बांगलादेशातील भूकंपाचे धक्के भारतातही 

पाकिस्तानकडून सातत्याने अणु चाचण्या केल्या जात असल्याने भूकंपाचा इशारा काही दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशमध्येही भूकंप आल्याने चांगलीच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप पहाटे 1:59 वाजता झाला, ज्याचे केंद्रबिंदू सुमारे 190 किलोमीटर खोलीवर होते. दुसरा, अधिक तीव्र भूकंप पाकिस्तानमध्ये पहाटे 3:09 वाजता जाणवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.