Yograj Singh Exclusive: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराय सिंह याचे वडील योगराज सिंह गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहेत. योगराज यांनी त्या सर्व चर्चांना फक्त अफवा आहे असं म्हटलं आहे, ज्यामध्ये ‘मी मरण्यासाठी तयार आहे…’ असा दावा करण्यात आला होता… माझ्या वक्तव्याला तोडून – मोडून सांगण्यात आलं… मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे… असं योगराज यांनी सांगितलं… योगराज सध्या एकटेच राहत आहे… पण हा त्यांच्या स्वतःचा निर्णय आहे… नुकताच योगराज यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे… योगराज सध्या सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत… योगराज यांनी स्वतःचं एक घर देखील तयार केलं आहे. ज्यामध्ये ते देवाची भक्ती करतात… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त योगराज यांची चर्चा सुरु आहे.
युवराज वडिलांना महिन्याला किती पैसे देतो…स्वतःच्या आयुष्याबद्दल योगराज सिंह म्हणाले, ‘मी स्वतःचं जेवण स्वतः बनवतो… तर यामध्ये अडचण काय आहे? मी स्वतःचं अंथरुण स्वतः साफ करतो… यामध्ये काय अडचण आहे…? आणि मला असंच जगायचं आहे… कारण मला कोणावर ओझं व्हायचं नाही… पण मला घरातले कायम विचारत असतात, तुम्ही कसे आहात? आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या… अशा वेळी मी त्यांना म्हणतो, मी पडेल तेव्हा मला सांभाळा… युवराज प्रत्येक महिन्याला माझ्या खात्यात 50 हजार रुपये टाकतो आणि मला विचारतो तुम्ही ठिक आहात ना…’
पुढे योगराज म्हणाले, ‘माझ्याबद्दल ज्याने वाईट बातम्या पसरवल्या आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई करणार… मी मरेल तेही बब्बर शेर सारखं… माझ्या पत्मी आणि मुलं माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. मी माझ्या आयुष्यात सर्वकाही मिळवलं आहे. आता, देवाची पूजा करण्यासोबतच, माझ्याकडे येणाऱ्या मुलांना उत्तम खेळाडू बनवण्याचं काम करत आहे. ‘
हे सुद्धा वाचा – युवराजच्या आईला घटस्फोट दिल्यानंतर नटीसोबत दुसरं लग्न, योगराज यांना किती मुलं, युवराजचे सावत्र भावंडांसोबत कसे संबध?‘मला आता काहीही नकोय… माझा महान मुलगा आहे युवराज सिंह, माझी मुलगी देखील स्पोर्ट्समध्ये सक्रिय आहे. माझा मुलगा, व्हिक्टर सिंग, हॉलिवूडचा सुपरस्टार बनण्याचं ध्येय ठेवत आहे. मी कॅलिफोर्नियामध्ये शूटिंग करत आहे… आणि तुम्हाला वाटेल की मी असं काही बोलेन? असं देखील योगराज सिंह म्हणाले आहेत.