लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची अडल्ट कॉमेडी असलेला 'मस्ती 4' हा चित्रपट बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. 2004 मध्ये सुरू झालेल्या 'मस्ती' फ्रेंचायजीच्या या नव्या चित्रपटाबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कुणी या चित्रपटाला चांगलं म्हणतायत तर कुणी नावं ठेवतायत. कसा आहे हा चित्रपट?
या चित्रपटात 'डबल मिनिंग' जोक्स वापरून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अनेकांनी या चित्रपटाला सर्वात मनोरंजक चित्रपटांपैकी एक म्हटलं आहे, तर काही लोक या चित्रपटाला अतिशय वाईट ठरवत आहेत. मात्र, काहींनी तर या चित्रपटाला 5 स्टार रेटिंग देण्याचीही मागणी केली आहे. 'मस्ती' फ्रेंचायजीची पहिली फिल्म 2004 मध्ये दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केली होती आणि प्रेक्षकांना ही अडल्ट कॉमेडी खूप आवडली होती. त्यानंतर त्यांनी आणखी दोन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मात्र, 'मस्ती 4' चं दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, मिलन यांनी पहिल्या दोन चित्रपटांची कथा लिहिली होती.
एका युझरने एक्सवर लिहिलं, 'माझ्याकडून या चित्रपटाला पूर्ण 5 स्टार'. विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब यांच्या 'मस्ती 4' पाहिल्यानंतर आणखी एका युजरने X वर आपलं मत लिहिलं, "मस्ती 4' हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम मनोरंजक चित्रपटांपैकी एक आहे. मी हा चित्रपट पाहिला आणि माझ्याकडून या चित्रपटाला पूर्ण 5 स्टार आहेत.', 'बेधडक आणि जबरदस्त कॉमेडीने भरलेला दमदार चित्रपट': आणखी एका युजरने चित्रपटाला 4 स्टार दिले. त्यांने लिहिलं की, 'हा चित्रपट बेधडक आणि जबरदस्त कॉमेडीने भरलेला आहे आणि या चित्रपटाने आपल्या फ्रेंचायजीचं वचन पूर्ण केलं आहे.'
काही युजर्स मात्र या चित्रपटाला कॉमेडीसाठी अतिशय वाईट ठरवत आहेत. एका युजरने म्हटले, "अडल्ट कॉमेडीच्या नावावर पत्नी पतीला एका आठवड्यासाठी कोणासोबतही शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देते, ज्याला 'लव्ह व्हिसा' म्हटलं जात आहे. हा 'चीप' नाही तर 'लीचड' चित्रपट आहे. कोणीतरी या चित्रपटाविरुद्ध केस दाखल करायला हवी." दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया दिली की, यावेळी चित्रपटात सर्व गोष्टी 'ट्रिपल'पेक्षा अधिक दिसत आहेत आणि ज्या प्रेक्षकांना अडल्ट कॉमेडी जॉनर आवडतो, त्यांच्यासाठी हा चित्रपट पूर्ण मनोरंजन करणारा आहे.
'मस्ती 4' ची कथा तीन मित्रांभोवती फिरते. रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय हे तिघेही त्यांच्या आयुष्यातील उलथापालथीदरम्यान 'मस्ती'च्या शोधात आहेत. त्यांना कळते की त्यांच्या पत्नींचे बाहेर अफेअर सुरू आहे. या तिघांना 'लव्ह व्हिसा' बद्दल माहिती मिळते आणि ते परदेश दौऱ्यावर निघून जातात. मात्र, हा प्रवास इतका सोपा नसून त्यांच्या आयुष्यात आणखी मजेदार ट्विस्ट आणि टर्न येणे बाकी आहे.
माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...