05809
‘सामाजिक बांधिलकी’ने
रस्त्यावरील खड्डा बुजविला
सावंतवाडी, ता. २१ ः येथील पालिकेजवळ पेट्रोल पंपासमोरील पदपथावर गेल्या कित्येक दिवसांपासून पडलेला धोकादायक खड्डा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे सिमेंट काँक्रीटने बुजविला.
या खड्ड्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. किरकोळ अपघातही त्याठिकाणी घडले होते. ही परिस्थिती पाहून शहर प्रमुख (माहिती अधिकारी) सुशील चौगुले, पोलीस मित्र सुमित (आबा) पिरणकर, मयूर सावंत, मनोज गुंजाळ, सुनील नाईक यांनी सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव यांच्याकडे खड्डा बुजवण्याची विनंती केली होती. याची दखल घेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे तो धोकादायक खड्डा सिमेंट काँक्रीटने बुजवला. तसेच तीनमुशी परिसरातील हॉस्पिटल मार्गावरील मोठा खड्डाही बुजविण्यात आला. याच खड्ड्यात आठ दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली होती. या कामात रवी जाधव, लक्ष्मण कदम, सुशील चौगुले, प्रशांत मोरजकर यांनी विशेष सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या पुढाकाराचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.