Alcohol : मद्यप्रेमींसाठी स्वर्ग आहेत ही ठिकाणे, भारतातील या शहरांमध्ये मिळते सर्वात स्वस्त दारू
Tv9 Marathi November 22, 2025 06:45 AM

भारतातील बरेच लोक दारूचे सेवन करतात, त्यामुळे सरकारला मद्यातून मोठ्या प्रमाणात महसूल देखील मिळतो. मात्र भारतात मद्याच्या किमती प्रत्येक शहरात वेगवेगळ्या आहेत. अनेक बड्या शहरांमध्ये मद्याच्या किमती जास्त आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतात सर्वात स्वस्त दारू कोणत्या शहरात मिळते आणि एका बाटलीची किंमत किती आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कमी उत्पादन शुल्क

ज्या राज्यात दारूवर कमी कर आकारला जातो त्या राज्यात दारूची किंमत कमी असते. गोवा या राज्यात सर्वात कमी कर आकारला जातो, त्यामुळे या राज्यात दारूच्या किमती खूप कमी आहेत. दिल्लीत दारूची बाटली 1500 रुपयांना मिळत असेल तर गोव्याती तिची किंमत फक्त 1100 रुपये आहे. कारण गोव्यात दारूवरील उत्पादन शुल्क 55 टक्के आहे, जे इतर शहरांमध्ये खूप जास्त आहे. गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने उत्पादन शुल्क कमी ठेवले आहे. त्यामुळे गोव्यात स्वस्त दारू मिळते.

या राज्यांमध्ये स्वस्त दारू

गोव्यात भारतातील सर्वात स्वस्त दारू मिळते. या यादीत हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांपेक्षा स्वस्त दारू मिळते. या राज्यातील दारूवरील उत्पादन शुल्क फक्त 43 टक्के आहे. याच कारणामुळे दिल्ली आणि आसपासचे लोक दारू पिण्यासाठी गुरुग्राम या हरियाणातील शहरात जाता. या दोन राज्यांव्यतिरिक्त दमणमध्येही खूप स्वस्त दारू मिळते. दमण हा एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळे या ठिकाणी स्वस्त दारू मिळते. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मात्र दमण हे गुजरातच्या सीमेवर आहे, त्यामुळे गुजरातमधील अनेक लोक दमणमध्ये मद्य सेवन करण्यासाठी येत असतात.

सिक्कीममध्येही दारू स्वस्त

हिमालयाच्या पायथ्याशी असलेले सिक्कीम हे राज्य आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणीही दारूची किंमत इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. कारण या राज्यांमध्येही उत्पादन शुल्क कमी आहे. तुम्हाला स्वस्त प्यायती असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशलाही जाऊ शकता. कारण या ठिकाणीही दारूचे दर कमी आहेत. देखील जाऊ शकता. या राज्यातही दारू स्वस्त आहे. तसेच लडाखमध्येही इतर राज्यांच्या तुलनेत दारू स्वस्त आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.