Entertainment News : अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच मस्ती 4 या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी त्याने दिलेल्या मुलाखतीही चर्चेत आहेत. विवेक 1200 करोड रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने बिझनेस करायला कधी सुरुवात केली याचा खुलासा केला.
विवेकने नुकतीच पिंकविला सिनेमाला मुलाखत दिली. यावेळी त्याला त्याने पहिले एक करोड कधी कमावले असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने त्याच्या संपत्ती आणि बिझनेसविषयी खुलासा केला.
तो म्हणाला की,"मी ट्रेडिंगमधून एक करोड रुपये कमावले होते. त्यावेळी मी 16-17 वर्षाचा होतो. त्यावेळी मी पैसे वाचवायचो. ही रक्कम पैशात नव्हती तर स्टॉकच्या रूपात होती. त्यानंतर 19 व्या वर्षी 12 करोड रुपये जमवले. त्यात माझा स्वतःचा हिस्सा फक्त 20-25 लाख रुपयांचा होता. पण आम्ही सगळ्यांनीच फायदा कमावला. कारण मी कायम गुंतवणूकदारांचा आधी विचार करायचो."
"त्यानंतर मी FinTeach,EdTech, रोडसाईड सेफ्टी असिस्टंट कंपनी, लॅब ग्राउन,डायमंड ज्वेलरी कंपनी, इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्सी कंपनी या कंपन्या स्थापन केल्या. ज्या सगळ्या चांगल्या चालू आहेत. त्यातूनच माझी संपत्ती येते, मी रोज सोळा तास काम करतो."
दरम्यान मस्ती 4 या सिनेमातून बऱ्याच काळाने आफताब,रितेश आणि विवेक एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मस्ती हा सिनेमा खूप गाजला होता. त्यानंतर आलेले दोन्ही पार्टस फारशी कमाई करू शकले नाही. पण मस्ती 4 च्या ट्रेलरची चर्चा आहे.
"यांच्या फार्महाऊसवर येणाऱ्या अभिनेत्रींनाच हे सिनेमात घेतात" नाना पाटेकरानंतर तनुश्रीचा सलमानवर निशाणा ?