नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्या वार्ड मधून कमी मते पडतील त्यांची काही खैर नाही
कार्यकर्त्यांनी कमी मतं पडणाऱ्या वॉर्डवर लक्ष देऊन काम केलं पाहिजे
पूर्वीचे आपापसातील वाद मिटवून कामाला लागा कुणाचीही तक्रार येता कामा नये नाहीतर तुमची ही खैर नाही.
अजित पवार, उपमुख्यमंत्रीमी कधीही जातीभेद केलेला नाही. कोणत्याही पक्षाने अल्पसंख्यांक नेत्याला विधानपरिषदेत संधी दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेसने ती दिली. आपल्याला मिळालेल्या 10 मंत्रिपदापैकी सर्व समाजाला मंत्रीपदे दिली नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जिल्ह्यात समन्वय नसल्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढवीत आहोत: मंत्री शंभूराज देसाई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी स्वतः भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले यांच्या बरोबर बैठक घेतली होती तरी देखील साताऱ्यात महायुतीमध्ये समन्वय होऊ शकला नसल्यामुळे तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. प्रत्येक पक्षाला वाटतं आपल्याला जास्त जागा असाव्यात. मात्र युती होऊ शकली नसली तरी मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढतोय. त्या बैठकीत भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी महायुतीची निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पुढे ढकलली होती मात्र त्यानंतर भाजपकडूनच कोणताही प्रतिसाद आला नसल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे...
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोडे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणातअमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीमध्ये स्थानिक भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे ह्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असताना कार्यकर्त्याला तिकीट न मिळाल्याने विरोधकांकडून टीका होत असताना मला ही तिकीट माझ्या पक्षाने माझं काम पाहून दिली आहे,मी तिकीट न मागता मला पक्षाने तिकीट दिली,मी वयाच्या 18 व्या वर्षापासूनच एबीव्हीपी च काम सुरू केलं,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सुद्धा मी काम केलं त्यानंतर मी सक्रिय राजकारणामध्ये आली,मी पक्षाची कार्यकर्ता म्हणून पक्षाने हा निर्णय घेतला, आणि पक्षाचा निर्णय हा माझ्यासाठी आदेश आहे त्यामुळे मी निवडणूक लढत आहे
भाजप नेते अमित साटम यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेभाजपाने काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन ‘दोन्ही ठाकरे यांना सुबुद्धी दे’ अशी प्रार्थना केली होती. त्यानंतर लगेचच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समर्थक अखिल चित्रे यांनी भाजप नेते अमित साटम यांचा एक व्हिडिओ शेअर करत पलटवार केला.
चित्रेंनी ट्विटद्वारे आरोप केला की “मुंबई पोलिसांची लाज काढणारे, उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी देणारे, महिलांविषयी अर्वाच्य भाषा वापरणारे अशा व्यक्तीला मुंबई भाजपाध्यक्षपद देणे कितपत योग्य?” असा सवाल उपस्थित केला. तसेच “देवा, आता तूच भाजपालाही सुबुद्धी दे, नाहीतर मराठी संस्कारात वाढलेले मुंबईकरच भाजपाला वठणीवर आणतील,” अशी कडवट टीका त्यांनी केली.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे मुंबईतील राजकीय तापमान वाढले असून भाजपाकडून यावर कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे जीर्ण, लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात.नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर अनेक वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. अंदाजे दोन हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या बंधार्यावर शासनाने कोठ्यावधीचा खर्च केला आहे . मात्र या बंधाऱ्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. बंधाराला अनेक ठिकाणी भगदळ पडले आहे . तर अनेक दरवाजे जिर्ण झाले आहेत. तसेच काही दरवाजे चोरीला गेले आहेत . त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी थांबत नाही.लाखो लेटर पाणी वाहून जात आहे.त्यामुळे संबंधीत विभागाने या कडे लक्ष देऊन उपाय योजना करावी आशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
वडवणीमध्ये टायर पेटवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखानदारांचा केला निषेधबीडच्या वडवणी तालुक्यातील लवूळ या गावामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून जिल्ह्यातील कारखानदारांचा निषेध केला. ऊसाला 3000 रूपयांपेक्षा अधिक भाव जाहीर करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्या या मागणीसाठी माजलगाव येथील परभणी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे चारचाकी ची दुचाकीला धडक, मराठा सेवक अतुल घरत यांचा मृत्यूपाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे रात्री चार चाकी स्विफ्ट गाडीने मराठा सेवक अतुल घरत यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातानंतर चार चाकी चालक फरार झाला. बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अतुल घरत यांना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या चारचाकी गाडीवर 'आण्णा' असा मजकुर असुन गाडीमध्ये पोलीसाची वर्दी आहे. हा घातपात असल्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त केला जात असुन फरार चालकाला अटक करण्याची मागणी होत आहे.
तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची वंचित बहुजन आघाडी सोबत युतीसांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे.स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी आणि माजी खासदार संजयकाका पाटलांनी नगरपरिषदेची निवडणूक लढवत असून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडला.. यावेळी सुजात आंबेडकर यांनी तासगाव शहराच्या विकासासाठी स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीला तासगावकर जनतेची साथ मिळेल,असा विश्वास व्यक्त केला आहे. तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे.
Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणारमनसे नेते अमित ठाकरे हे आज नवी मुंबईतील नेरुळ येथे दाखल होणार आहेत. नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सकाळी ११ वाजता उपस्थित राहतील. तसेच, या शिवस्मारकाचे अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी ते नेरुळ पोलीस स्थानकात हजर राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेले चार महिने अनावरण झाले नव्हते. याबद्दल मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत या पुतळ्यावरील आवरण हटवून त्याचे अनावरण केले होते. या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे यांनी यापूर्वी नकार दिला होता आणि आपण स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून नोटीस स्वीकारू असे सांगितले होते.
मोहिते पाटलांनी सहकारी पत संस्था व बॅंका मोडून खाल्या; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना डिवचलेग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा अकलूजच्या मोहिते पाटील यांना डिवचले आहे.
मोहिते पाटील यांनी बॅंका आणि पतसंस्था मध्ये गोरगरीब लोकांनी ठेवलेले पैसे मोडून खाल्ले.इतकच नाही तर लोकांच्या जमिनी आणि कोंबड्या ही खाल्या अशी टिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
-nashik-yeola-रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार चालकाला अज्ञात वाहनाची धडकनगर-मनमाड महामार्गावर येवल्याच्या बाभुळगाव शिवारात कार रस्त्याच्या कडेला उभी करुन फोनवर बोलत असलेल्या चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात कार चालकाचा मृत्यू झाला,पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला असून कार चालक हा धुळे जिल्ह्यातील असल्याच सांगण्यात येतय.
निकाल आधीच भाजपाचे शंभर नगरसेवक बिनविरोध,हे लोकशाहीसाठी धोका - सुजात आंबेडकर.निकाल आधीच भाजपाचे शंभर नगरसेवक बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोका आहे,असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे.सांगलीच्या तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.माजी खासदार संजयकाका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तासगाव नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे.या निवडणुकीसाठी सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ पार पडला, यावेळी सुजात आंबेडकरांनी भाजपावर टीका करताना,निकाला आधीच 100 नगरसेवक विजय घोषित झाले आहेत,हे होत असताना विरोधकांच्या वर दबावा आणून त्यांचे अर्ज बाद करून,हे करण्यात आले आहे असून हा प्रकार लोकशाहीला धोका आणि खतरा असल्याचं सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.