आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या जीवनातही लागू पडतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीचे असे काही लक्षणं सांगितले आहेत, हे लक्षणं जर कोणत्या व्यक्तीमध्ये असतील तर अशा व्यक्तीपासून तुम्ही चार हात दूर रहा, त्यातच तुमचं भलं आहे, असा सल्ला चाणक्य देतात, चाणक्य म्हणतात असे लोक प्रचंड स्वार्थी असतात, ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. असे लोक केव्हाही तुमची फसवणूक करू शकतात, तुमचा फायदा घेऊ शकतात, अशा लोकांमुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशी लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
चांगुलपणाचा गैरफायदा – चाणक्य म्हणतात तुम्ही एखाद्या व्यक्तीशी खूप चांगलं आणि सरळ वागता, परंतु जर एखादा व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल तर अशा व्यक्तीपासून वेळीच सावध व्हा. असा व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो. अशा व्यक्तीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जे लोक फक्त त्यांच्या कामासाठी तुमच्याजवळ येतात, आणि त्यांचं काम साध्य झाल्यानंतर ते तुम्हाला साधी ओळख पण दाखवत नाहीत, अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात अशी लोक संधिसाधू असतात, अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे.
तुमच्यावर संकट येताच जे लोक तुमच्यापासून दूर जातात अशा लोकांना वेळीच ओळखा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. खरा मित्र तोच असतो, जो संकट काळात तुमच्या मदतीला धावून येतो. मात्र असे काही लोक असतात, जे तुमच्यावर संकट येताच तुमच्यापासून दूर जातात असे लोक हे स्वार्थी असतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)