Summary -
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची अकोल्यात आत्महत्या
अकोल्यात राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे महानगरप्रमुख वैभव घुगे यांची आत्महत्या
धावत्या ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या
ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते होते
अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने आत्महत्या केली. धावत्या ट्रेनसमोर उडी मारत त्याने आयु्ष्य संपवलं. हा पदाधिकारी आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता होता अशी देखील माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पोलिस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Maharashtra Politics: शिंदेसेनेचा नगराध्यक्ष भाजपनं पळवला, दिल्लीवारीनंतरही शिंदेंची कोंडी सुरुचमिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुखाने आत्महत्या केली. वैभव घुगे असे आत्महत्या केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव होते. अकोल्यातील जुन्या आरटीओ रोडवरील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. वैभव घुगे हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते होते.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामावैभव घुगे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, वैभव घुगेंनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. वैभव घुगेंच्या आत्महत्येने अकोल्यातील राष्ट्रवादीकाँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वैभव घुगे यांच्या आत्महत्येमुळे कुंटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांच्या समोर या आत्महत्येमागचं खरं कारण शोधण्याचे मोठं आव्हान असणार आहे.
Sangli Politics : सांगलीत प्रचारादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट आपापसात भिडले; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप