'१० रुपयाचा बिस्कीट पुडा कितीला आहे?' विचारणाऱ्या शादाब जकातीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...अश्लीलता पसरवल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
esakal November 28, 2025 05:45 PM

Shadab Jakati Biscuit Packet Controversy : सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हायरल होतो. काही व्हिडिओ हसवणारे असतात, तर काही थक्क करणारे असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो किंवा फेसबुक असो, सगळीकडे “'१० रुपयाचा बिस्कीट पुडा कितीला आहे जी?” या डायलॉगवर लोक रील्स बनवत आहेत. मात्र, ज्या व्यक्तीमुळे हा डायलॉग व्हायरल झाला, त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शादाब जकाती असं या व्यक्तीचं नाव आहे. तो मेरठच्या इंचौली गावातील रहिवासी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत शादाब किराणा दुकानात जाऊन ''१० रुपयांचा बिस्किट पुडाला किती आहे?" असा प्रश्न विचारतो आहे. पण त्याने ज्या प्रकारे हा प्रश्न विचारला आहे, त्याची ती पद्धत लोकांना प्रचंड आवडली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध गायक बादशाहनेही यावर व्हिडिओ बनवला आहे. तसेच क्रिकेटर रिंकू सिंह आणि कुलदीप यादव यांनीही यावर व्हिडिओ बनवले आहेत.

Shadab Jakati : ''दस रुपयेवाला बिस्कुट कितने का दिया जी..'' म्हणत फेमस झालेले शादाब जकाती आहेत तरी कोण?

दरम्यान, याच शादाब जकातीला गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अश्लील कंटेट बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. महत्त्वाचे म्हणजे जामीन मिळाल्यानंतर त्याने माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

Viral Video : नवीन पोपट हा लागला रील पाहायला! मोबाईल चालवण्यात आहे सुपर एक्स्पर्ट, पाहा व्हायरल व्हिडिओ

तो म्हणाला, “तो व्हिडिओ मी माझ्या मुलीला घेऊन बनवला होता. त्या व्हिडिओत मी एवढंच म्हटलं होतं की तुम्ही इतक्या क्यूट दिसता, सुंदर दिसता तर तुमची आईही इतकी सुंदर असेल. यात काहीही चुकीचं किंवा गैर नव्हतं. मला वाटलं नव्हतं की याला अश्लील मानलं जाईल.” पुढे बोलताना, “मी विचारपूर्वक व्हिडिओ टाकला होता, पण नंतर मी तो डिलीट केला. जर कुणाचं मन दुखावलं असेल तर आम्ही माफी मागतो.” अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.