Sanatan Dharma Conversion : जबलपूरच्या खमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिव मंदिरात मंगळवारी दुपारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि राष्ट्रीय महिला परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरवापसी व शुद्धीकरण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विशेष समुदायातील (मुस्लिम) १५ पुरुष आणि महिलांनी वैदिक पूजन, गौमूत्र सेवन आणि मंत्रोच्चारांसह सनातन धर्म स्वीकारल्याची घोषणा केली. आयोजकांच्या मते ही प्रक्रिया पूर्णपणे स्वेच्छेने पार पडली.
बंजारा समुदायाशी संबंधित कुटुंबेकार्यक्रमात सहभागी झालेली सर्व कुटुंबे बंजारा समाजातील असल्याचे सांगण्यात आले. विविध भागांमध्ये त्यांना ‘डेरा वाले’ म्हणूनही ओळखले जाते. ही कुटुंबे मध्यप्रदेश, राजस्थान आणि आसपासच्या ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत.
VIDEO : 'हनुमान चालीसा'चा नवा विक्रम! YouTube वर 5 अब्ज व्ह्यू पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ, दुसऱ्या क्रमांकावर कोणतं गाणं?पारंपरिकरित्या बकरी पालन आणि उंट व्यवसाय ही त्यांची ओळख राहिली आहे. कुटुंबांनी सांगितले, की 'आता मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्थिर आयुष्यासाठी ते कायमस्वरूपी स्थायिक होऊ इच्छितात.'
या प्रकरणाची चर्चा एक दिवस आधी झाली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बरेला पोलीस ठाण्यात जाऊन या कुटुंबांबाबत दस्तावेजांतील अनेक विसंगती आणि संशयास्पद ओळख असल्याचा आरोप करत निवेदन दिले होते. संघटनांनी २७ नोव्हेंबरपर्यंत कारवाईची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी हा ‘घरवापसी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या प्रांतीय अध्यक्ष प्रीती धंधारिया म्हणाल्या, “या कुटुंबांनी स्वतःहून सनातन संस्कृती स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. शिव मंदिरात वैदिक विधीनुसार शुद्धिकरण, पूजन आणि संकल्प करून त्यांना सनातन धर्मात सामील करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम स्वेच्छेने आयोजित करण्यात आला.”