ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका अर्थाज एशेज मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 8 गडी राखून पराभूत केलं. पहिला कसोटी क्रिकेट सामना अवघ्या दोन दिवसात संपला. या सामन्यात ट्रेव्हिस हेडचा झंझावात पाहायला मिळाला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ कमबॅकसाठी प्रयत्न करणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. या सामन्यातही संघात काही बदल केला गेला नाही. या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्स वगैरे खेळेल असं वाटत होतं. पण तसं होताना दिसत नाही. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना दुसऱ्या कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही.
गाबा कसोटी सामना 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. हा सामना डे नाईट असणार आहे आणि गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियात संघात काहीच बदल केलेला नाही. पर्थ कसोटीसाठी 14 खेळाडूंचा संघच ब्रिस्बेनमध्ये उतरणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा स्टीव्हन स्मिथच्या हाती असणार आहे. त्याच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. पॅट कमिन्स पाठदुखीचा त्रास असून त्यातून सावरत आहे. इतकंच काय तर गोलंदाजीचा सरावही सुरु आहे. त्यामुळे त्याचं पुनरागमन लवकर होऊ शकतं. पण ऑस्ट्रेलियाने त्याला आणखी एका सामन्यासाठी आराम दिला आहे.
पॅट कमिन्ससह आणखी दोन खेळाडू जखमी आहेत. त्यामुळे त्यांनाही या संघात स्थान मिळालं नाही. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याला संघात जागा मिळाली नाही. कारण अजूनही तो फिट नाही. तर ओपनर उस्मान ख्वाजा याला पहिल्या कसोटी दुखापत झाली असूनही संघात ठेवलं आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, कैमरन ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, बोउ वेबस्टर, मिचेल स्टार्क, एलेक्स कैरी, ब्रँडन डॉगेट, माइकल नीसर, नाथन लायन और स्कॉट बोलँड.