इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी सांगितले की ते या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांनी तयार केलेला गाझा प्लानचा दुसरा टप्पा सुरु होण्याच्या खूप जवळ आहे. ही भेट गाझातील शांततेचा प्रयत्न आणि हमासच्या शासनाला समाप्त करण्यासंदर्भातील पावलांवर केंद्रीत असणार आहे. नेतान्याहू यांनी ही माहिती जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत दिली होती.
दोन वर्षांपासून गाझात सुरु असलेले युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प यांच्या योजनांवर दोन्ही देशा दरम्यान चर्चा सुरु आहे.या प्लानमध्ये हे टप्पे सामील आहेत.
1. इस्रायली ओलीसांची सुटका
2. गाझात अंतरिम तांत्रिक पॅलेस्टाईन सरकारची स्थापना
3. आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलाच्या टेहळणीत बोर्ड ऑफ पीसची स्थापना
नेतान्याहू यांनी म्हटले आहे की पहिला टप्पा पूर्ण होत आला आहे आणि दुसऱ्या टप्प्यावर महत्वाची बोलणी लवकरच होतील.
१० ऑक्टोबर रोजी सिजफायर घोषीत झाल्यानंतर गाझात हिंसा कमी झाली आहे, परंतू पूर्णपणे थांबलेली नाही.आतापर्यंत हमासने २० जिवंत इस्रायली ओलीस आणि २७ मृतदेहांना परत केले आहे. याच्या बदल्यात सुमारे २ हजार पॅलेस्टीनी कैद्यांना सोडण्यात आले आहेत.एका इस्राईल ओलीसाचा मृतदेह अजूनही गाझात आहे.
शनिवारी वेस्ट बँक येथे इस्राईल सैनिकांनी दोन पॅलेस्टीनींना गोळ्या घालून ठार केले आहे. एक १७ वर्षांचा तरुण आणि एक पादचारी या गोळीबारात सापडला. इस्राईली सैन्याने सांगितले की हेब्रोनच्या एका चेकपॉईंटवर कार वेगाने त्यांच्याकडे आणि त्यानंतर सैनिकांनी गोळीबार केला.
वेस्ट बँकमध्ये या वर्षी हिंसा सातत्याने वाढत आहे. सैन्याने अनेक भागातील येजा करणाऱ्यावर कठोर नियम लादले आहे. आणि सतत छापेमारी केली आहे. पॅलेस्टीनी मंत्रालयाच्या मते जानेवारी पासून आता पर्यंत ५१ पॅलेस्टीनी अल्पवयीन इस्राईल कारवाईत ठार झाले आहेत. तसेच पॅलेस्टीनी समुहांद्वारा इस्रायली सैनिक आणि नागरिकांवर अनेक हल्ले केले आहेत.