Merchant Navy And Indian Navy Recruitment: अनेक तरुण समुद्रावर करिअर करण्याचे स्वप्न पाहतात आणि त्यासाठी हे कॉलेज जीवनापासूनच तयारी करत असतात. नेव्ही म्हटलं की इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही हे दोन्ही पर्याय समोर येतात.
पण दोघांत नक्की फरक काय? कुठे जास्त पगार? कुठे जास्त सुविधा? आणि तुमच्यासाठी कोणता करिअर मार्ग सर्वोत्तम? या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या या विशेष लेखात आपण जाणून घेणार आहोत.
ST Students Scholarship: ST विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणाची सुवर्णसंधी! राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीचा अर्ज कसा करायचा जाणून घ्यामर्चंट नेव्ही की इंडियन नेव्ही मधील फरक काय आहे?
या दोन्ही नोकऱ्या समुद्रावर आहेत. मात्र काम वेगवेगळे आहे. चला तर पाहुयात
इंडियन नेव्हीइंडियन नेव्ही ही देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करते.
शत्रूंपासून सुरक्षा, हल्ल्याना उत्तर देणे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण ह्या जबाबदऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले जाते.
जहाजे हे सरकारच्या मालकीची असतात.
मर्चंट नेव्हीव्यावसायिक क्षेत्र आहे. जहाजांद्वारे माल वाहतूक केली जाते. जसे की तेल वस्तू, औद्योगिक सामान इत्यादी.
खाजगी आणि सरकारी कंपन्या या क्षेत्रात काम करतात.
उच्च पगार, परदेशात राहणे आणि आंतरराष्ट्रीय करिअर
पात्रता आणि प्रशिक्षण इंडियन नेव्ही:NDA किंवा INA सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण.
प्रशिक्षणानंतर बी.टेक किंवा तत्सम पदवी मिळते.
लष्करी शिस्त, नेतृत्व कौशल्ये आणि राष्ट्रीय सुरक्षा यांवर भर.
मर्चंट नेव्ही10+2 विज्ञान शाखा (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आवश्यक.
18 महिन्यांचे कठोर समुद्र प्रशिक्षण.
प्रशिक्षणानंतर कॅडेट्स जहाजावर सहाय्यक अधिकारी म्हणून काम करतात.
सागरी तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय नियम आणि नेव्हिगेशनवर भर.
कामाचे स्वरूप इंडियन नेव्हीकाम गतिमान, बदलणारे आणि जबाबदारीने भरलेले असते.
ऑपरेशन्स कधी 8 तास, कधी 12 तास, कधी संपूर्ण दिवस चालतात.
पदोन्नती अनुभव, सेवा कालावधी आणि स्पर्धा परीक्षांवर अवलंबून असते.
मर्चंट नेव्हीड्युटी नियमित, 8-9 तासांच्या शिफ्टसह.
उर्वरित वेळ विश्रांतीसाठी.
पदोन्नती समुद्रात घालवलेल्या वेळा आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यावर अवलंबून.
Budget-Friendly Travel For Indians: भारतीयांसाठी टॉप 6 बजेट-फ्रेंडली डेस्टिनेशन्स; जाणून घ्या एका आठवड्याचा अंदाजे खर्च किती? फायदे आणि सुविधा इंडियन नेव्हीरहिवास: सरकारी निवास / बंगल्यांचे व्यवस्थापन
वैद्यकीय सेवा: मोफत
पेन्शन: सुरक्षित
सुट्ट्या: सरकारी नियमानुसार
जीवनशैली: शिस्तबद्ध, राष्ट्रीय सेवा
मर्चंट नेव्हीरहिवास: ऑनबोर्ड सुविधा / हॉस्टेल नाही
वैद्यकीय सेवा: आंतरराष्ट्रीय मानके, वैद्यकीय विमा
पेन्शन: नाही
सुट्ट्या: करारावर आधारित वाढीव सुट्ट्या
जीवनशैली: ग्लॅमर, आंतरराष्ट्रीय अनुभव
पगार
मर्चंट नेव्ही:प्रारंभिक पगार: 3 लाख ते 20 लाख+ वार्षिक.
पगार आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित, कर सवलतींसह.
इंडियन नेव्ही:भारत सरकारद्वारे निश्चित पगार, पद आणि अनुभवावर अवलंबून.
स्थिरता आणि दीर्घकालीन सुरक्षा मोठा फायदा.