डोंबिवली : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीची तारीख 20 डिसेंबरला ढकलताच शहरातील राजकीय पट पुन्हा एकदा हलला आहे. प्रचारासाठी आधीच कोट्यवधींची उधळण केलेल्या उमेदवारांचे संपूर्ण गणित बिघडले असून, आता नव्याने रणनिती आखण्याची धडपड सुरू झाली आहे. महायुतीचे सूर राज्यात जुळत असले तरी अंबरनाथमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा थेट दोन गटांचा ‘स्ट्रेट फाइट’ आकाराला आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी मनिषा अरविंद वाळेकर (शिंदे गट) आणि तेजश्री करंजूले (भाजपा) यांच्यातील संघर्ष ही या निवडणुकीची खरी मध्यवर्ती लढत मानली जात आहे.
राज्यात महायुतीचा गजर सुरू असला तरी अंबरनाथमध्ये समीकरण पूर्णपणे वेगळे आहे. येथे थेट भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी टक्कर उभी राहिली आहे. नगराध्यक्षा पदाच्या स्पर्धेत शिंदे गटाच्या मनिषा अरविंद वाळेकर आणि भाजपाच्या तेजश्री करंजूले यांच्यातील सामना ही निवडणुकीची मुख्य लढत ठरली आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांत दिवसरात्र रणनीतीचे बैठकी सुरू असून ‘कोणाचा किल्ला भक्कम’ हे पाहण्यासाठी पक्षनेतेही या भागात नियमित फेऱ्या मारताना दिसत आहेत.
Ro-Ro Boat: ‘रो-रो’साठी कोट्यवधींचा हट्ट! देशात प्रथमच सरकारकडून आर्थिक मदतीचा प्रयोग प्रचारात पोकळी : सोशल मीडिया रणांगण बनलेनिवडणूक पुढे ढकलल्याने प्रत्यक्ष घराघरातील प्रचारात अचानक खंड पडला. या पोकळीचा परिणाम टाळण्यासाठी आता दोन्ही गटांचे लक्ष सोशल मीडियाकडे वळले आहे. बूथवार लक्ष्यपत्रके, डिजिटल व्हिडिओ, आक्रमक व्हॉट्सअॅप मोहीम, स्थानिक इन्फ्लुएन्सर्सचा वापर, अशा विविध साधनांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ जोरात सुरू आहे.
भाजपची ‘गुप्त राजकीय चाल’? – विरोधी गटांना संदेशाची कुजबुजनिवडणूक पुढे ढकलल्यानंतर निर्माण झालेल्या रिकाम्या काळात भाजपने ‘गुप्त राजकीय चाल’ खेळल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील उमेदवारांना भेटून “तुमचा प्रचार तुम्ही करा… पण मतदारांना एक नंबरचे बटण दाबायला सांगा” असा विनंती सारखा संदेश देण्यात आल्याच्या कुजबुजीमुळे अंबरनाथचे राजकारण अधिकच तापले आहे. काही उमेदवारांना यासाठी लाखोंची आर्थिक ‘मदत’ दिल्याची गोपनीय चर्चा देखील वातावरणाला गती देते आहे. अंबरनाथ मध्ये भाजपाचे किती नगरसेवक येतात यापेक्षा नगराध्यक्ष पदावर फोकस करा असा संदेश भाजपा कार्यकर्त्यांना वरिष्ठाच्या गोटातून आल्याचे बोलले जातं आहे. या चर्चामुळे निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला आहे.
Dombivli Politics: बदल्यांच्या आदेशात मयत, निवृत्त आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावं, महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड बदलापूरसारखा पैशांचा पाऊस अंबरनाथमध्येही पडणारबदलापूरच्या निवडणुकीत मतदारांकडे खुलेपणाने पैशांची उधळण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्येही हा ‘ट्रेंड’ दिसणार का, यावर सर्वांचे लक्ष आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने प्रचारासाठी आणखी निधी ओतावा लागणार असल्याने उमेदवारांवरील आर्थिक दबाव वाढला आहे.
निवडणूक जवळ येताच वातावरण तापलेशहरातील वातावरण दिवसेंदिवस तंग होत असून प्रचाराची भाषा, आरोप–प्रत्यारोप, सोशल मीडिया युद्ध—सगळेच अधिक आक्रमक होत आहेत. 20 डिसेंबरची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी ही लढत प्रतिष्ठेची नव्हे तर राजकीय अस्तित्वाची बनत चालली आहे. अंबरनाथमधील ही निवडणूक महायुतीतील अंतर्गत समीकरणे किती स्थिर आहेत, याचीही मोठी परीक्षा ठरणार असल्याचे बोलले जातं आहे.