India vs UAE Under U19s Asia Cup Live marathi: वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत दुबईचे मैदान गाजवले. त्याने ९५ चेंडूंत ९ चौकार व १४ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली. त्याच्या द्विशतकाची सर्वांना प्रतीक्षा होती, परंतु त्याला वंचित राहवे लागले. वैभवचे हे युवा वन डे क्रिकेटमधील हे तिसरे जलद शतक ठरले.
SMAT 2025: गंभीरच्या राजकारणाचा बळी पडलेल्या गोलंदाजाने घेतली हॅटट्रिक; ट्वेंटी-२० संघातून दाखवला होता बाहेरचा रस्ता, पठ्ठ्याने...यूएईने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले.आयुष म्हात्रे ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर वैभव व आरोन जॉर्ज यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४६ चेंडूंत २१२ धावांची भागीदारी करून यूएईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. आरोन ७३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारानंतर माघारी परतला. पण, वैभवचा वेग काही थांबला नाही. त्याने विहान मल्होत्रासह चौथ्या विकेटसाठी झटपट ४६ धावा जोडल्या.
वैभव द्विशतकाच्या जवळ पोहोचला होता आणि तो पहिले द्विशतक झळकावेल असेच वाटले होते. पण, ३३व्या षटकात त्याच्या खेळीला उद्दीश सूरीने ब्रेक लावला. त्याने ९५ चेंडूंत ९ चौकार व १४ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली. त्याच्या १४ षटकारांनी विक्रमाला गवसणी घातली. युवा वन डे सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने नावावर केला.
हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल हिलच्या नावावर होता. त्याने २००८ मध्ये नामिबियाविरुद्ध ७१ चेंडूंत १२४ धावांची खेळी करताना १२ चौकार लगावले होते. भारताच्या उन्मुक्त चंदने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ चौकार व ६ षटकार खेचून १११ धावा केल्या होत्या.
IND vs UAE U19 : ६,६,६,६,६,६,६,६,६ ! वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक, आशिया चषकात रचला इतिहास; खुणावतंय द्विशतक...हे वृत्त लिहिले तेव्हा भारताच्या ३८ षटकांत ३ बाद २९४ धावा झाल्या होत्या. विहान २१ व वेदांत त्रिवेदी २१ धावांवर खेळत होते.