डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रशासनिक गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. केडीएमसीच्या वर्ग ४ संवर्गातील अतिक्रमण व फेरीवाला पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आदेशांमध्ये प्रचंड विसंगती आढळून आल्याने कर्मचारीवर्गात नाराजी निर्माण झाली आहे. महापालिकेने नुकतेच बदल्यांचे आदेश जारी केले. मात्र या यादीत मयत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
याहून विशेष म्हणजे, काही कर्मचारी ज्या प्रभागात कार्यरत आहेत त्याच प्रभागात त्यांची पुन्हा बदली दाखल करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे बदल्या प्रक्रिया केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Eknath Shinde: मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणातसेच गेली अनेक वर्षे एकाच प्रभागात स्थिरावलेले काही कर्मचारी अजिबात न हलवता, केवळ सहा महिन्यांपूर्वी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याच पुन्हा केल्या गेल्याने बदल्या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व बदल्यांमध्ये नेमका कोणाचा वरदहस्त आहे? कोणासाठी जाणीवपूर्वक बदल्या केल्या जात आहेत? असा सवाल कर्मचारी आणि जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा धुरळा वाढण्याची शक्यता असून आगामी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडला जाणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे या अनियमितता आणि विसंगतीवर आयुक्त स्वतः लक्ष देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Mumbai News: मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा; सुधारीत भोगवटा अभय योजनेची एकनाथ शिंदेंकडून घोषणाकेडीएमसीचा हा भोंगळपणा हा पहिलाच प्रसंग नसून, वारंवार गैरव्यवस्थापनाच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता आयुक्तांच्या पुढाकाराची आणि कारवाईची नागरिक वाट पाहत आहेत.