Latest Marathi News Live Update : तुटपुंजी नुकसान भरपाईवरून निलेश राणे विधानसभेत आक्रमक
esakal December 13, 2025 03:45 AM
Live: तुटपुंजी नुकसान भरपाईवरून निलेश राणे विधानसभेत आक्रमक

अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील १८३७१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी केवळ ४ कोटी ८ लाख रुपयाची तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली आहे. यावरूनच कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विदर्भात जो एनडीआरएफचा निकष लावला त्याच धर्तीवर कोकणात देखील निकष लावून जास्तीतजास्त नुकसान भरपाई कोकणातील शेतकऱ्यांना देण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. सरकार जर न्याय देणार नसेल तर आम्ही दात कोणाकडे मागायची असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत उपस्थित केला.

Live: मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती हिंगोली मध्ये मूकबधिर निवासी विद्यालयात साजरी करण्यात आली आहे, राष्ट्रसंत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चिमुकल्यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली अर्पण केली होती.

Live: शरद पवारांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एका पंपावर ८६ रुपये प्रति लिटर पेट्रोल

आपल्या नेत्याचा वाढदिवस प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या परीने साजरा करत असतो. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात एका कार्यकर्त्यांने अनोख्या पद्धतीने शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गिरीश गुरनानी या कार्यकर्त्याने आज शरद पवारांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना ८६ रुपये प्रति लिटर पेट्रोल उपलब्ध करून दिलं आहे.

पेट्रोल चे दर सामान्यांना परवडणारे नाहीत आणि पेट्रोल ही दररोज लागणारी मूलभूत गरज झाली असल्याचं म्हणत त्याने आज सकाळपासून पुण्यातील कोथरूड भागातील एका पेट्रोल पंपावर १०५ रुपये प्रति लिटर असणारे पेट्रोल नागरिकांना ८६ रुपये प्रति लिटर दरात उपलब्ध करून दिलं आहे.

Mumbai Live: विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण धडक, तिघे गंभीर जखमी

विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल पादचारी पुलाखाली दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या जोरदार धडकेत तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीच्या उपचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे विक्रोळी ते घाटकोपर दरम्यानच्या पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Solapur Live : स्वाभिमानी शेतकऱ्यांचा पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, सोलापूरमध्ये आंदोलन पेटलं

सोलापूर जिल्ह्यात उसदर वाढीच्या मागणीचं आंदोलन पुन्हा पेटलं आहे. उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा, या मुख्य मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनाला गती मिळाली आहे.

Kalyan Live : कल्याण डोंबिवलीत थंडीचा जोर वाढला, पारा १२ अंशावर कल्याण डोंबिवलीत थंडीचा जोर,वाढला ,कल्याणात 12.8, डोंबिवलीत पारा 13.4 अंशांवर विधानभवन राडा प्रकरणी हिवाळी अधिवेशनात गदारोळ

विधानभवन राडा प्रकरणी हिवाळी अधिवेशनात गदारोळ

सर्जेराव टकलेंना विधानभवनात बंधी घालावी

टकलेंना २०२९ पर्यंत विधानभवनात बंदी घालण्याची मागणी करण्यात

या प्रकरणावरून सुधीर मनगुंटीवर आक्रमक झाले.

सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी लाच घेतल्याचा आरोप

राज्यात सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख घेत आहे.

बीड येथील अखिल नावाची व्यक्ती यासाठी वसुली करत आहे

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप

शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? वडेट्टीवारांची सरकारवर टीका

राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज : मंत्री जयकुमार गोरे

मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात १५ हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली यावर वडेट्टीवर यांनी आक्षेप घेतला.

राज्यात ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत,अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे.

सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गोरे यांनी मान्य केले चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची ४७२ जागा रिक्त आहेत.

राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

राज्यातील शिक्षणाचा झाला खेळखंडोबा, जिल्हा परिषद शिक्षकांची पदे रिक्तच

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पद लवकरात लवकर भराव्या, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज मागणी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

२० लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी महाराष्ट्रात

२० लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी महाराष्ट्रात असणार आहे आणि १५ हजार लोकांना जीसीसीद्वारे थेट रोजगार मिळणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्ट मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

सीबीएसई अभ्यासक्रमातील शिवरायांच्या उल्लेखावरून वाद

सीबीएसईच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा उल्लेख केवळ ६८ शब्दांत करण्यात आल्याने यावर आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळात आवाज उठवला.

उद्धव ठाकरे मविआ आमदार नार्वेकरांची भेट घेणार

उद्धव ठाकरे आणि मविआ आमदार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत आणि चर्चा करणार आहेत.

Pune Liveupdate : थार, फॉर्चूनर सारख्या महागडा स्पोर्ट कारवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड शहरात थार आणि फॉर्च्यूनर सारख्या महागड्या स्पोर्ट कारला पूर्णपणे काळ्या फिल्मसह रस्त्यावर चालवणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून दंड आकारला आहे. तसेच पोलिसांनी स्वतःच्या हाताने एक थार कार आणि एक फॉर्च्यूनर कारची काळी फिल्म काढली आहे.

RatnagiriLiveupdate : कोकणातील कात उद्योजक ईडीच्या रडारवर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ईडीची धाड

कोकणातील कात उद्योजक ईडीच्या लक्षातरत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील कात उद्योजकांवर ईडीची कारवाईसावर्डे आणि खेड येथील कात उद्योजक सचिन पाकळे यांच्यावर ईडीची छापेमारी२४ तास उलटूनही अद्याप ईडीची चौकशी सुरुचसकाळी ६ वाजल्यापासून ईडीच्या दोन टीम उद्योजक पाकळे यांच्या कार्यालयातचौकशीत कोणती कागदपत्रे आणि मालमत्तेची चौकशी झाल्याची सुत्रांची माहिती

Kolhapur live update: गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली बिशी वेळेत न देता आल्याने भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदावरील व्यक्तीचा आत्महत्याचा प्रयत्न

गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली भिशी वेळेत न देता आल्याने भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदावरील व्यक्तीने आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरातील भाजप जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदाराने गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला होता. मात्र वेळेत पैसे देऊ न शकल्याने विष घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

Nashik Live : राजमुन्द्रीवरून 15 हजार झाडे नाशकात येणार

 राजमुन्द्रीवरून निघालेले 15 हजार झाडे नाशकात दाखल व्हायला सुरुवात

- पहिल्या टप्प्यातील 1 मोठे कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल

- गिरीश महाजन यांनी राजमुन्द्री येथे जाऊन स्वतः निवडले 15 हजार देशी झाडे

- उद्यापासून होणार वृक्षलागवडीला होणार सुरुवात

Nagpur live : महायुती म्हणून लढण्याचा निर्णय, चर्चा सुरु- एकनाथ शिंदे

आम्ही महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Nagpur Live : नागपुरात तापमान 10 अंशावर, ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

नागपुरात आजच तापमान 10 अंशाची नोंद

कालच्या 8.1 अंश तापमान नोंदवल्या गेले असतांना आज 1.9 अंशांनी घट झाली आहे

मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने पारा 10 अशाच खाली नोंदवत होता,

Buldhana Live : नगराध्यक्षपदासाठी 5- 7 कोटी खर्च होत असल्याचा उम्मेदवाराचा दावा

नगराध्यक्षपदासाठी पाच- सात कोटी खर्च होत असल्याचा उम्मेदवाराचा दावा

समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरातील प्रकार

New Delhi News : ‘एसआयआर’ची मुदत सहा राज्यांत वाढली

नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या व्यापक पडताळणीसाठी सुरू असलेल्या मोहिमेची उत्तर प्रदेशसह सहा राज्यांतील मुदत निवडणूक आयोगाने वाढविली आहे. या निर्णयामुळे उत्तरप्रदेशसह तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान-निकोबारमधील मतदारांना अर्ज जमा करण्यासाठी वाढीव कालावधी मिळेल. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा करताना स्पष्ट केले, की या राज्यांमध्ये आलेल्या अर्जांची संख्या आणि प्रशासकीय कारणे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तमिळनाडू आणि गुजरातमध्ये एसआयआर अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत रविवारपर्यंत (ता. १४ डिसेंबर) होती.

P. G. Medhe Passes Away : राजारामसह कुंभी भोगवती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांचे निधन

कोल्हापूर : येथील साखर उद्योगाचे अभ्यासक राजारामसह कुंभी भोगवती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांचे आज निधन झाले आहे.

Kolhapur Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने कोते येथे आई-वडिलांना मारहाण

धामोड : कोते (ता. राधानगरी) येथील तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने आईला शिवीगाळ केली. तसेच वडील सुनील भिकाजी पाटील (वय ५७) यांच्या डोक्यात लोखंडी बार घालून जखमी केले. याबाबत मुलगा अक्षय सुनील पाटील (वय २७) याच्याविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Lionel Messi : फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी! लिओनाल मेस्सी उद्यापासून ३ दिवस भारत दौऱ्यावर

लिओनाल मेस्सी उद्यापासून ३ दिवस भारत दौऱ्यावर येत आहे. मेस्सी भारतात येत असल्याने फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह दिसत आहे. कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत मेस्सीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मेस्सी त्याच्या टूरच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

Belgaum Weather : हुक्केरीवासीयांना हुडहुडी, बेळगावकरही गारठले; तापमान ७.२ अंश सेल्सिअसपर्यंत; बेळगाव @१२ अंश

बेळगाव : शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून गत दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी (ता. ११) शहर आणि परिसरातील सर्वच भागांत तापमानात घट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पहाटे व रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. शहराच्या तुलनेत हुक्केरीत सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून ७.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. त्यामुळे हुक्केरीवासीयांना हुडहुडी भरली आहे. बेळगाव शहराचे तापमान १२.४ अंश सेल्सिअस इतके होते.

Shivraj Patil Chakurkar Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.

Anna Hazare : ३० जानेवारीपासून अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला; राळेगणसिद्धीत संत यादवबाबा मंदिरात सुरू होणार आंदोलन

Latest Marathi Live Updates 12 December 2025 : महाराष्ट्रात सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी, अन्यथा ३० जानेवारीपासून पुन्हा राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. तसेच भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. मतदारयाद्यांच्या व्यापक पडताळणीसाठी सुरू असलेल्या मोहिमेची उत्तर प्रदेशसह सहा राज्यांतील मुदत निवडणूक आयोगाने वाढविली आहे. या निर्णयामुळे उत्तरप्रदेशसह तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान-निकोबारमधील मतदारांना अर्ज जमा करण्यासाठी वाढीव कालावधी मिळेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित ‘गोल्ड कार्ड’च्या विक्रीची अधिकृत घोषणा केली. या कार्डधारकांना कायदेशीर दर्जा मिळून त्यांना अमेरिकेचे नागरिक होता येईल पण हे कार्ड खरेदी करण्यासाठी व्यक्ती अथवा कंपनीला भरभक्कम रक्कम मोजावी लागेल. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.