भिवंडीत अल्पवयीन मुलगी बेपत्ता
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) ः शहरातील नागाव परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. शांतीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी (ता. ९) सकाळी ही मुलगी घरातून गेली, पण परत आली नाही. कुटुंबाने आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.