Akshaye Khanna अक्षय खन्ना-धुरंधर
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे चांगसाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. 'छावा' नंतर अक्षयने पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.
Akshaye Khanna अक्षय खन्नाचे भाऊ
अक्षय खन्ना प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहेत. अक्षय खन्नाला दोन भाऊ आहेत. एक राहुल खन्ना आणि दुसरा सावत्र भाऊ साक्षी खन्ना
Sakshi Khanna साक्षी खन्ना
विनोद खन्ना यांची दोन लग्न झाली. त्यांनी कविता खन्नाशी दुसरे लग्न केले. साक्षी खन्ना विनोद खन्ना आणि कविता खन्ना यांचा मुलगा आहे.
Sakshi Khanna साक्षीचा जन्म
साक्षी खन्नाचा जन्म 12 मे 1991 रोजी मुंबईत झाला. वडील आणि भावाप्रमाणे साक्षीनेही अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. पण या क्षेत्रात त्याला जास्त यश मिळाले नाही.
Sakshi Khanna करिअर
मीडिया रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' आणि मिलन लुथरिया यांच्या 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले. त्यानंतर त्याने अनेक लघुपटांमध्ये काम केले.
Sakshi Khanna अध्यात्म
साक्षी खन्नाने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केले. त्यानंतर तो अध्यात्माकडे वळला, ज्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला.
Sakshi Khanna चाहता वर्ग
साक्षी खन्नाचे इन्स्टाग्राम 14.1 फॉलोअर्स आहेत. तो कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपले हटके फोटोशूट शेअर करत राहतो.
Sakshi Khanna बहीण कोण?
साक्षी खन्ना, राहुल खन्ना आणि अक्षय खन्ना यांनी एक बहीण देखील आहे. जिचे नाव श्रद्धा खन्ना असे आहे.
Akshaye Khanna NEXT : अक्षय खन्ना झाला मालामाल; एकापाठोपाठ एक चित्रपटांची लॉटरी, वाचा यादी येथे क्लिक करा...