CIDCO Home : नवी मुंबईत फक्त २२ लाखात घर, सिडकोची प्राईम लोकेशनवर लॉटरी
Saam TV December 13, 2025 01:45 PM

CIDCO Housing Scheme : अटल सेतू अन् आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. नवी मुंबईमध्ये राहणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कनेक्टिव्हिटीमुळे नवी मुंबई- मुंबई हा प्रवास सोयीस्कर झालाय. त्यामुळे घरांच्या किंमतींनी उच्चांक गाठलाय. सर्व सामान्यांसाठी आता सिकडोकडून (CIDCO) स्वस्तात मस्त घरांची लॉटरी काढली आहे. अटल सेतूपासून जवळ असलेल्या ठिकाणी फक्त २२ लाख रूपयांत घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोने स्वस्तात मस्त घरे विक्रीसाठी उपल्बध करून दिली आहेत. या फ्लॅट्सची किंमत अंदाजे 22.18 लाख रूपयांपासून सुरू आहे.

EWS, LIG फ्लॅट्सची किंमत

सिडकोच्या हाऊसिंग स्कीम अंतर्गत द्रोणागिरीमध्ये EWS फ्लॅट्सची किंमत अंदाजे 22.18 लाख रूपये इतकी आहे. तर LIG फ्लॅट्सची किंमत 30.17 लाख रुपये आहे. नवी मुंबईतील तळोजा, खारघर या ठिकाणीही सिकडोकडून स्वस्तात मस्त घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र २२ लाखात फ्लॅट्स कुठे?

द्रोणागिरी मध्ये EWS फ्लॅट्स सेक्टर 11 (प्लॉट नं. 1) आणि सेक्टर 12 (प्लॉट नॅ. 63 आणि 68) उपलब्ध आहेत.LIG फ्लॅट्स सेक्टर 11 (प्लॉट नॅ. 1) आणि सेक्टर 12 (प्लॉट नंबर 63 आणि 68) मध्ये उपलब्ध आहे.EWS कॅटेगरीतील फ्लॅट्सचा कारपेट एरिया 25.81 स्क्वायर मीटर आहे. तर LIG फ्लॅटचा कारपेट एरिया 29.82 वर्ग मीटर आहे. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत घरासाठी अर्ज करता येऊ शकतो. सिडकोच्या cidcofcfs.cidcoindia.com वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. सिडकोच्या या घरांसाठी पीएमएवाय अंतर्गत ईडब्ल्यूएस कॅटेगरी पात्र अर्जदारांना 2.50 लाख रुपयांची सब्सिडीही मिळणार आहे.

Anna Hazare : मोठी बातमी! अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा, ठिकाण अन् उपोषणाची थेट तारीख सांगितली कुठल्या घरांची किती किंमत? वाचा सविस्तर

द्रोणागिरी

(सेक्टर ११ - प्लॉट १, सेक्टर १२ - प्लॉट ६३, ६८)

ईडब्ल्यूएस (EWS): ₹२२,१८,०५९

एलआयजी (LIG): ₹३०,१७,६८२

तळोजा (सेक्टर २१ - प्लॉट ८, सेक्टर २२ - प्लॉट १, सेक्टर ३७ - प्लॉट १)

ईडब्ल्यूएस (EWS): ₹२१,७१,५५६

एलआयजी (LIG): ₹३०,५८,५७८

तळोजा (सेक्टर २७ - प्लॉट १)

ईडब्ल्यूएस (EWS): ₹२२,३१,०१०

एलआयजी (LIG): ₹३१,१२,७८६

तळोजा (सेक्टर ३४ - प्लॉट १, ६; सेक्टर ३६ - प्लॉट २)

ईडब्ल्यूएस (EWS): ₹२३,५९,६२३

एलआयजी (LIG): ₹३४,४०,७१६

खारघर (सेक्टर ४० - प्लॉट १)

ईडब्ल्यूएस (EWS): ₹२६,४९,७१७

एलआयजी (LIG): ₹३७,९५,१७२

कळंबोली (सेक्टर १५ - प्लॉट ९)

ईडब्ल्यूएस (EWS): ₹२६,३२,३६८

एलआयजी (LIG): ₹३७,४७,१५८

घणसोली (सेक्टर १० - प्लॉट १, २)

एलआयजी (LIG): ₹३६,७२,५०५

पुण्यात ५३२ कोटींचा प्रोजेक्ट, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, वाचा नेमका प्लान आहे तरी काय
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.