वडगाव मावळ, ता. १५ : वडगाव पोलिसांना येथील पंचायत समितीसमोर आजारी अवस्थेत आढळून आलेल्या एका अनोळखी पुरुषाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी वडगाव येथील पंचायत समितीसमोर आजारी अवस्थेत एक अनोळखी पुरुष आढळून आला होता. त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अधिक माहितीसाठी वडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस हवालदार आशिष काळे यांनी केले आहे.