सध्या सर्वत्र ‘धुरंधर’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल स्टारर हा चित्रपट २०२५मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपट ३०० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपट ठरत आहे. त्यासोबतच चित्रपटाने हिंदी सिनेमाच्या इतिहासात दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाईचा रेकॉर्डही केला आहे. याशिवाय या चित्रपटाने भारतात ५ नवे रेकॉर्ड केले आहेत. चला जाणून घेऊया आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’च्या १०व्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टबद्दल…
‘धुरंधर’ने १०व्या दिवशी किती कमाई केली?
समोर आलेल्या आकड्यांनुसार, धुरंधरने १०व्या दिवशी ५८.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती ठरला आहे आणि बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. चित्रपटाने पुष्पा २च्या कमाईला मागे टाकत हिंदी सिनेमाच्या इतिहासात दुसऱ्या रविवारची सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला एकूण १४६.६० कोटी रुपयांची कमाई केली.
‘धुरंधर’ने १० दिवसांत किती नफा कमावला?
रणवीर सिंगने स्वतःसाठी नवा रेकॉर्ड केला आहे. तसेच चित्रपटाने एका दिवसात सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड स्थापित केला आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार ‘धुरंधर’ने पहिल्या आठवड्यात २१८ कोटी कमावले आहेत. तर दुसऱ्या वीकेंडवर त्याची कमाई १४६.५० कोटी होती. यासोबतच १० दिवसांनंतर धुरंधरचे भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन ३६४.६० कोटी रुपये झाले आहे. २२५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या बॉलिवूड स्पाय अॅक्शन थ्रिलरने ६२% नफा कमावला आहे आणि बॉक्स ऑफिसवर त्याला पॉझिटिव्ह रेटिंग मिळाली आहे.
१०व्या दिवशी ‘धुरंधर’ने बनवले हे ६ नवे रेकॉर्ड
बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा रेकॉर्ड तोडण्याचे काम सुरूच आहे. दुसऱ्या रविवारी शानदार प्रदर्शन करत आदित्य धरच्या या चित्रपटाने भारतात ६ नवे रेकॉर्ड केले आहेत:
-रणवीर सिंगची सर्वाधिक सिंगल डे कलेक्शन असलेली फिल्म (५८.२० कोटी)
-हिंदी सिनेमाच्या इतिहासात दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा; याने पुष्पा २ च्या ५४ कोटी कलेक्शनला मागे टाकले आहे.
-छावा (१४०.७२ कोटी) ला मागे टाकत २०२५मध्ये बॉलिवूडचा सर्वात मोठा दुसरा वीकेंड कलेक्शन करणाऱ्या फिल्मचा रेकॉर्ड बनवला.
-हिंदी सिनेमात आतापर्यंतचा सर्वात मोठा दुसरा वीकेंड कलेक्शनचा रेकॉर्डही ‘धुरंधर’ने आपल्या नावे केला.
-‘सैयारा’ (३३७.६९ कोटी)ला मागे टाकत २०२५ची दुसरी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे.
-कबीर सिंग (२७८.२४ कोटी)ला मागे टाकत आता भारतीय सिनेमात तिसरा सर्वाधिक कमाई करणारा अॅडल्ट सिनेमा ठरला आहे.